रायपूर : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांनी पेरलेल्या आयईडीच्या स्फोटात सोमवारी (९ जून) एक अतिरिक्त अधीक्षक दर्जाचा पोलिस अधिकारी ठार झाला. अनेक कर्मचारी आणि अधिकारी जखमी झाले, असे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले. (IED blast in Sukma)
श्री शर्मा यांनी एएसपी आकाश राव गिरीपुंजे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
“सुकमा जिल्हा कोंटा विभागातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) आकाश राव गिरीपुंजे यांना कोंटा-एराबोरा रस्त्यावर दोंड्राजवळ झालेल्या प्रेशर आयईडी स्फोटात गंभीर दुखापत झाली आहे. सीपीआय (माओवादी) ने १० जून रोजी भारत बंदची हाक दिली आहे. यादरम्यान कोणत्याही प्रकारची नक्षलवादी घटना घडू नये, यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश गिरीपुंजे परिसरात पायी गस्त घालत होते,” असे एका पोलिस अधिकाऱ्याने आधी सांगितले होते. (IED blast in Sukma)
त्यावेळी हा भयंकर स्फोट झाला. यावेळी गिरीपुंजे गंभीर जखमी झाले होते.
अधिकाऱ्याने असेही सांगितले की, या प्रेशर आयईडी स्फोटात इतर अधिकारी आणि जवानही जखमी झाले आहेत परंतु त्यांनी त्यांची नेमकी संख्या स्पष्ट केली नाही. त्यांनी पुढे सांगितले की इतर जखमी अधिकारी धोक्याबाहेर आहेत. ‘‘सर्व जखमींवर कोंटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अतिरिक्त एसपी आकाश राव यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. इतर जखमी सध्या धोक्याबाहेर आहेत. अतिरिक्त एसपी आकाश राव यांना पुढील उपचारांसाठी उच्च वैद्यकीय केंद्रात हलवण्यात आले होते, मात्र त्यांचा मृत्यू झाला,’’ असे अधिकाऱ्याने सांगितले.(IED blast in Sukma)
हेही वाचा :
रेल्वेतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू
कॉन्ट्रॅक्ट किलर्सना सुपारी देऊन नवविवाहितेनेच केला पतीचा खून