ICC Ranking : वन-डे, टी-२० क्रमवारीत भारत अग्रस्थानी

ICC Ranking

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वार्षिक क्रमवारीमध्ये भारतीय संघाने वन-डे आणि टी-२० या दोन्ही प्रकारांतील अग्रस्थान कायम ठेवले. कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वलस्थानी आहे. (ICC Ranking)

वार्षिक क्रमवारी निश्चित करताना मे, २०२४-एप्रिल, २०२५ या कालावधीतील कामगिरी १०० टक्के, तर तत्पूर्वीची कामगिरी ५० टक्के विचारात घेतली जाते. भारतीय संघाने मागील वर्षभरामध्ये टी-२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या दोन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारताचे वन-डे क्रमवारीत १२४ गुण झाले असून भारत अग्रस्थानी आहे. भारताने या कालावधीत एकूण ३६ वन-डे सामने खेळले. भारताखालोखाल न्यूझीलंड दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या दोन्ही संघांचे समान १०९ गुण झाले असले, तरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे उपविजेता असल्याचा फायदा न्यूझीलंडला झाला. (ICC Ranking)

टी-२० क्रिकेटमध्ये भारताने वर्षभरात एकूण ५७ सामने खेळले असून भारत २७१ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ २६२ गुणांसह दुसऱ्या, तर इंग्लंड २५४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. टी-२० वर्ल्ड कपचा उपविजेत्या असणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघास मात्र २४५ गुणांसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. टी-२० क्रमवारीत या वर्षी प्रथमच शंभर देशांना स्थान देण्यात आले. त्यावरून टी-२० क्रिकेटचा जागतिक प्रसार वाढत असल्याचे स्पष्ट होते. मागील वर्षीपर्यंत क्रमवारीतील संघांची संख्या ८० इतकी होती. (ICC Ranking)   

कसोटी क्रमवारी मात्र भारताला पहिल्या तीन संघांमध्येही स्थान पटकावता आलेले नाही. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा संघ १२६ गुणांसह पहिल्या, तर इंग्लंडचा संघ ११३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावरील दक्षिण आफ्रिकेच्या नावावर १११ गुण असून भारताला १०५ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

हेही वाचा :
रबाडाला खेळण्यास परवानगी
अँडरसनला खेळणे सर्वांत कठीण

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर