Hindu Janajagruti Samiti : कोल्हापुरात मालेगाव स्फोट खटल्यातील निर्दोष व्यक्तींचा सत्कार

Hindu Janajagruti Samiti

कोल्हापूर : प्रतिनिधी : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. निर्दोष मुक्तता झालेल्या व्यक्तींचा सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता देवल क्लब येथे सत्कार करण्यात येणार आहे. भगवा आतंकवाद’ हा खोटा प्रचार कोणी, का आणि कशासाठी केला? त्या मागील षड्यंत्राचे धागेदोरे कोणते? या सर्व प्रश्‍नांना उत्तर देणारा विशेष कार्यक्रमही यावेळी होणार आहे. (Hindu Janajagruti Samiti)

हिंदू जनजागृती समितीने या संदर्भात पत्रक प्रसिद्ध केले आहे. पत्रकात असे म्हटले आहे की, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटातील सात आरोपींची  ३१ जुलै २०२५ या दिवशी निर्दोष मुक्तता केली.  मालेगाव प्रकरणातील निर्दोष सुटका झालेल्या समीर कुळकर्णी, मेजर रमेश उपाध्याय यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणातील हिंदु विधीज्ञ परिषदचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषदचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदुत्वनिष्ठ लेखक विक्रम भावे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे संघटक सुनील घनवट हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. (Hindu Janajagruti Samiti)

या विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, तसेच राज्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह असंख्य हिंदुत्वनिष्ठ संघटना, गडदुर्गप्रेमी, शिवप्रेमी, संप्रदाय, मंडळे, सामाजिक संघटना यांच्या भेटीगाठी चालू आहेत. या कार्यक्रमाला सर्व हिंदुत्वनिष्ठ, राष्ट्रप्रेमी नागरिक, शिवभक्त, तरुण व समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सुनील घनवट यांनी केले आहे. (Hindu Janajagruti Samiti)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर