कोल्हापूर मधील रस्ते नीट करा ; उच्च न्यायालयाची सूचना  

High Court orders to improve roads in Kolhapur

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरमधील सजग व सामाजिक जाणीव असलेल्या लोकांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे प्रशासनाने कोल्हापुरातील रस्त्यांची कामे सुरु केलेली आहेत याबाबत कौतुक करून प्रशासनाने रस्ते दुरुस्त करण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे असा उल्लेख आज कोल्हापूर उच्च न्यायालयातील न्या. मकरंद कर्णिक आणि न्या. अजित कडेठाणकर यांनी सुनावणी दरम्यान केला. रस्त्यांचे कामकाज एकएक पायरी नीट ठरवून होऊ द्या व आपण सविस्तर विचार नंतर करू असे न्या. मकरंद कर्णिक यांनी स्पष्ट केले. पुढील सुनावणी १८ डिसेंबरला होणार आहे.

रस्ते प्रश्नांवर जागरुक नागरिकांकडून याचिका

कोल्हापूर शहरातील रस्ते गेली अनेक वर्षे खराब होत चाललेले आहेत परंतु रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केले जातेय असा आरोप करणारी याचिका उदय नारकर, डॉ. रसिया पडळकर, डॉ. अनिल माने, भारती पोवार, ॲड सुनीता जाधव, डॉ. तेजस्विनी देसाई यांनी ॲड. असीम सरोदे व सहकारी वकील ॲड. श्रीया आवले, ॲड. योगश सावंत आणि ॲड. सिद्धी दिवाण यांच्या मार्फत दाखल केलेली आहे. (High Court orders to improve roads in Kolhapur)

रस्त्यांचे काम नीट करु द्या

कोल्हापूरातील रस्ते पावसामुळे खराब झाल्याचे कारण प्रशासनातर्फे देण्यात येते हा बेजाबदारपणा आहे व रस्त्यांची अवस्था अत्यंत गंभीर आहे असे याचिकाकर्ते उदय नारकर म्हणाले.  सध्या अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने केली जाणारी कोल्हापूर शहरातील रस्त्यांची डागडुजी आक्षेपाहार्य असल्याचे सांगण्याचा प्रयत्न आजच्या सुनावणी दरम्यान ॲड. असीम सरोदे यांनी केला परंतु रस्त्यांचे कामकाज एकएक पायरी नीट ठरवून होऊ द्या व आपण सविस्तर विचार नंतर करू असे न्या. मकरंद कर्णिक म्हणाले. (High Court orders to improve roads in Kolhapur)

खराब रस्त्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ

कोठेही, कशाही पद्धतीने रस्ते उकरायला दिली जाणारी परवानगी आणि विविध युटिलिटी च्या कामांसाठी उकरलेले रस्ते यामुळे कोल्हापूर शहर हे एखाद्या उध्वस्त झालेल्या शहरासारखे भासू लागलेले आहे. सामान्य माणसांना स्पॉडिलायसिस, सर्दी, डोळेदुखी असे आजार होत आहेत. उपननगरातील रस्त्यांबाबत तर यापेक्षा गंभीर परिस्थिती आहे. रस्त्यांच्या या अत्यंत दर्जाहीन परिस्थितीमुळे, मणक्याचे दुखणे, कमरेचे दुखणे, गाड्यांच्या देखभाल खर्चामध्ये प्रचंड वाढ आणि धुळीच्या लोटांमुळे हवेच्या प्रदूषणामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. याशिवाय, खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झालेली असून, वाहतूक कोंडी, त्यामुळे खर्च होणारे अधिकचे इंधन हे सर्व देखील आता नागरिकांच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलेले आहे असे कोल्हापूरकरांचे दुःख याचिकेतून मांडण्यात आल्याचे ॲड. श्रीया आवले, ॲड. योगश सावंत आणि ॲड. सिद्धी दिवाण यांनी युक्तीवाद केला.  (High Court orders to improve roads in Kolhapur)

पुढील सुनावणी १८ डिसेंबरला

या जनहित याचिकेतील आरोपांवर उत्तर देण्यासाठी आज महानगर पालिका कोल्हापूर, जिल्हा परिषद कोल्हापूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कोल्हापूर, नगर विकास मंत्रालय यांच्या तर्फे पुन्हा अवधी मागून घेतला त्यामुळे पुढील सुनावणी १८  डिसेंबर ला ठेवण्यात आली आहे.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर