मेजर स्वाती महाडिक यांना रणरागिनी ताराराणी पुरस्कार जाहीर

Major Swati Mahadik awarded Tararani Award

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठा महासंघांच्यावतीने मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार २०२५ हा मेजर स्वाती संतोष महाडिक यांना जाहीर करण्यात आला आहे.  पुरस्काराचे वितरण समारंभ १० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चोक, कोल्हापूर येथे होणार आहे. मेजर स्वाती महाडिक या जम्मू काश्मीर येथे अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सातारा येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या वीर पत्नी आहेत, अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वराज्यरक्षिका, करवीर राज्य संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या उज्वल व महापराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी व त्यांचा अनभिज्ञ इतिहास समाजापुढे यावा व त्यांचे जीवन चरित्र प्रसार देशभर व्हावा यासाठी मराठा महासंघाच्यावतीने विविध उपक्रम आयोजित केले आहेत.या वर्षीपासून मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्काराची सुरुवात केली आहे. (Major Swati Mahadik awarded Tararani Award)

कर्नल संतोष महाडिक शहीद झाल्यानंतर त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी सैन्य दलात भरती होण्याचा संकल्प त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी केला, तसेच त्यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा अंगीकार करण्याचा निश्चय करीत आपल्या जीवनात महाराणी ताराराणी यांच्या प्रमाणे संघर्षमय जीवनाची दिशा स्वीकारली. या त्यांच्या आदर्शाची युवा पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

महाराणी ताराराणी चौक येथे १० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मेजर स्वाती महाडिक यांचे आगमन होईल. तेथे महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्याला मेजर स्वाती महाडिक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण होईल. तेथून प्रमुख कार्यकर्त्यांसह दसरा चौक येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आगमन होईल. याठिकाणी मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार मेजर स्वाती संतोष महाडीक यांना मेजर जनरल एम.एन. काशीद, पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते  आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या अध्यक्षतेखाली  होणार आहे. कर्नल अमरसिंह सावंत, कर्नल विक्रम नलावडे, शिवाजीराव परुळेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  इतिहास संशोधक  महाराणी ताराबाई: एक अभ्यास या विषयावर यांचे व्याख्यान होणार आहे. (Major Swati Mahadik awarded Tararani Award)

पत्रकार परिषदेला शैलजा भोसले, सी. एम गायकवाड, चंद्रकांत चव्हाण, उदय देसाई, बबनराव रानगे, एम.डी.देसाई, प्रकाश पाटील, विजय पाटील, शरद साळुंखे, कादर मलबारी, संजय कांबळे, अवधूत पाटील उपस्थित होते.

Related posts

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला सुवर्ण, ज्ञानेश्वरी, मुथुपांडी, ऋषिकांतला रौप्य

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

लॉजमध्ये गर्भलिंग चाचणी; दोन एजंट महिलांना अटक