उच्च न्यायालयाकडून गोकुळची निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश

High Court orders the commencement of the Gokul election

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश राज्य सरकार आणि दुग्ध विकास विभागाला दिले. (High Court orders the commencement of the Gokul election)

सर्वोच्च न्यायालयाने गोकुळची निवडणूक ९० दिवसाच्या आत घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची मुदत तीन ऑगस्ट रोजी संपत असताना देखील शासनाने कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली नसल्याने निवडणूक प्रक्रिया रखडली आहे. राज्य सरकार जाणीवपूर्वक निवडणूक ढकलण्याचा आरोप करत राधानगरी तालुक्यातील पुंगाव येथील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यवसायिक संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडात याचिका दाखल केली होती. (High Court orders the commencement of the Gokul election)

या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती मिलिंद जाधव आणि न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य सरकारने कच्ची यादी प्रसिद्ध न केल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने गोकुळची दूध संघाची निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. निवडणूक कार्यक्रम त्वरीत सुरून केल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी संबधितांवर कायद्यातील तरतुदीनुसार योग्य कारवाई येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांकडून ज्येष्ठ विधीज्ञ श्रीनिवास पटवर्धन, भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली. (High Court orders the commencement of the Gokul election)

Related posts

स्टुडंट, इडियट आणि अंधभक्त!

‘प्रोटीन पावडर आणि एनर्जी ड्रिंक्समुळे वाढतोय किडनी स्टोनचा धोका’ :  डॉ. राजेंद्र नेर्ली

हरजिंदर कौर,  गुलवीर सिंगने पटकावली रौप्य पदके