नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारतीय नागरिकत्वाच्या दर्जाला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी (५ मे) फेटाळून लावली. (HC dismissed plea)
कर्नाटकातील भाजप कार्यकर्ते एस. विघ्नेश शिशिर यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की राहुल गांधी यांच्याकडे भारत आणि इंग्लंडचे दुहेरी नागरिकत्व आहे. त्यामुळे ते संविधानाच्या कलम ८४ (अ) अंतर्गत निवडणूक लढण्यास अपात्र ठरतील.
यापूर्वी, केंद्राने इंग्लंड सरकारकडून माहिती पडताळण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने गृह मंत्रालयाला १० दिवसांची मुदत दिली होती. (HC dismissed plea)
२०१९ मध्ये, तत्कालीन राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीनंतर गृह मंत्रालयाने राहुल गांधी यांना त्यांच्या नागरिकत्वाबाबत नोटीस बजावली.
२००३ मध्ये बॅकऑप्स लिमिटेड नावाची कंपनी इंग्लंडमध्ये नोंदणीकृत होती. गांधी हे कंपनीच्या संचालक आणि सचिवांपैकी एक म्हणून सूचीबद्ध होते, असा आरोप स्वामींनी केला होता.
स्वामींनी असाही दावा केला होता की, राहुल गांधी यांनी इंग्लंडमधील कंपनीच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये त्यांचे राष्ट्रीयत्व ब्रिटिश असल्याचे घोषित केले होते. (HC dismissed plea)
‘‘१० ऑक्टोबर २००५ आणि ३१ ऑक्टोबर २००६ रोजी दाखल केलेल्या कंपनीच्या वार्षिक रिटर्नमध्ये तुमची जन्मतारीख १९ जून १९७० ही देण्यात आली होती. तुम्ही तुमचे राष्ट्रीयत्व ब्रिटिश असल्याचे घोषित केले होते. शिवाय, १७ फेब्रुवारी २००९ रोजीच्या बरखास्ती अर्जात, तुमचे राष्ट्रीयत्व ब्रिटिश म्हणून देखील नमूद करण्यात आले होते,’’ असे यासंबंधीच्या नोटीसमध्ये म्हटले होते.
हेही वाचा :
भाजपने इंदिरा गांधींचा इतिहास बघावा
तुर्कस्थानची युद्धनौका कराची बंदरात दाखल