गुवाहटी : दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत सावधपणे खेळ करत पहिल्या दिवशी दिवसअखेर ६ बाद २४७ धावा केल्या. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने तीन बळी मिळवले. ट्रिसस्टन स्टब्स आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी तिसऱ्या गड्यांसाठी ८४ धावांची भागिदारी केली.
दक्षिण अफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. सलामीवरील एडन मार्कराम आणि रायन रिकेल्टनने ८२ धावांची भागीदारी केली. मार्करामने ३८ धावा केल्या. बुमराहने त्याचा त्रिफळा उडवला. रिकेल्टनला कुलदीपने टिपले. त्याने ३५ धावा केल्या. यष्टीरक्षक ऋषभ पंतने झेल टिपला. (Guwahati Test Cricket)
त्यानंतर बावुमा आणि स्टब्जने खेळपट्टीवर ठाण मांडले. त्यांनी भारतीय फिरकी गोलंदाजीचा समाचार घेत खराब चेंडूवर चौकार मारले. बावुमाला रवींद्र जडेजाने बाद केले. मिडऑफला यशस्वी जयस्वालने त्याचा झेल टिपला. त्याने ४१ धावा केल्या. स्टब्जने जडेजाला षटकार ठोकला पण त्यानंतर कुलदीपच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये के.एल. राहूलने झेल घेतला. त्याचे अर्धशतक एक धावेने हुकले. टोनी झोर्झीने मोहम्मद सिराजने बाद केले. ऋषभ पंतकडे झेल देऊन परतलेल्या झोर्झीने २८ धावा केल्या. वायन मुल्डरला कुलदीप यादवने बाद केले. (Guwahati Test Cricket)