राज्यात जनगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू

Four teachers conducting the census in the state have died

मुंबई : प्रतिनिधी : राज्यात जणगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. शिक्षकांच्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. (Four teachers conducting the census in the state have died)

शाळांना उन्हाळ्याची सुट्टी असली तरी शिक्षकांना यंदा जनगणनेचे काम देण्यात आले आहे. भर उन्हात दुपारी शिक्षकांना दारोदारी जाऊन जनगणनेची माहिती गोळा करावी लागत आहे. जनगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू झाला. पुणे बेंगळूर महामार्गावर कान्हे फाटा येथे भरधाव डंपरच्या धडकेत जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षिका दीपाली तांबे याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मावळ तालुक्यातील शिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशीही जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांना बोलावले जात आहे, त्याबद्दल शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. (Four teachers conducting the census in the state have died)

दीपाली तांबे यांच्या आधी कोल्हापुरातील भगवान पाटील, सांगोला येथील राजाराम ढोले या शिक्षकांचा हृदयविकाराने मृत्यू झाला लातूरमधील सुंदरम वांगसकर यांचाही अपघाती मृत्यू झाला. जनगणनेच्या कामामुळे येणाऱ्या तणावामुळे हे मृत्यू होत असल्याची भावना शिक्षक वर्गात व्यक्त होऊ लागली आहे. शिक्षकांच्या मृत्यूमुळे त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. जनगणना करणाऱ्या प्रगणकांचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे, तसेच कुटुंबियांना अनुकंपाखाली नोकरी द्यावी अशी मागणी कोल्हापुरातील खासगी शिक्षक महासंघाने केली आहे. महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. (Four teachers conducting the census in the state have died)

Related posts

वैभव सूर्यवंशीचे शतक हुकल्याने क्रिकेटशौकीन हळहळले

‘काँग्रेस’ची पंढरपूर वारीच्या कालावधीत ‘एसआयआर’  कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी

मविआ विधान परिषदेच्या १७ जागा लढवणार : हर्षवर्धन सपकाळ