व्हिएतनाममध्ये ३२ भारतीय पर्यटकांची बोट उलटली; १५ जणांचा मृत्यू

A boat carrying Indian tourists capsized in Vietnam

नवी दिल्ली : व्हिएतनाममध्ये पर्यटकांची बोट उलटून १५ जणांचा मृत्यू झाला. या बोटीवर ३२ भारतीय पर्यटक होते. फुक्वोक बेटाजवळ हा अपघात झाला. २३ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. (A boat carrying Indian tourists capsized in Vietnam)

व्हिएतनाममधील भारतीय दुतावासाने या घटनेला दुजोरा दिला आहे. स्थानिक वेळेनुसार ११ जुलै रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ३२ भारतीय पर्यटकांना घेऊन स्पीडबोटीने प्रवास करत होते. बोटीवर काही कर्मचारी आणि फ्लाइट अटेडंट होते. ही बोट मिन्ह हुई फु क्वोक ट्रेंडिंग अँड टुरिझम कंपनीच्या मालकीची आहे. (A boat carrying Indian tourists capsized in Vietnam)

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळीही हा अपघात झाला त्यावेळी परिसरात पाऊस पडत नव्हता. मात्र, समुद्रातील लाट अत्यंत वेगवान आणि तीव्र होत्या. बोट उलताच आसपासच्या इतर पर्यटकांच्या बोटी मदतीसाठी तात्काळ धावून गेल्या. अवघ्या पाच मिनिटात इतर बोटीमधील चालकांनी बचावकार्य सुरू केले. अनेक पर्यटक बोटीच्या आत अडकल्याने सुरवातीला अडचणी आल्या. २१ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले असून १३ पुरुष आणि दोन महिला अशा १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. (A boat carrying Indian tourists capsized in Vietnam)

Related posts

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सरकार नमले;  रोहित पवार यांचा दावा

सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली राम मंदिर देणगी चोरीची चौकशी करा – कन्हैया कुमार

खंडणीसाठी उद्योगपतीच्या बंगल्यावर गोळया झाडणाऱ्या चौघांचा एनकाऊंटर