Four killed in fire in Vita city : लग्नघरात आग लागून चौघांचा मृत्यू

Four killed in fire in Vita city

सांगली : सांगली जिल्ह्यातील विटा शहरात भांडी आणि फर्निचरच्या दुकानाला आग लागून चौघांचा मृत्यू झाला. दोन महिलासह एक पुरुष आणि दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. जोशी यांच्या घरी विवाह सोहळ्याची तयारी सुरू असताना ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

विष्णू पांडुरंग जोशी (वय ५०), त्यांची पत्नी सुनंदा जोशी (४५), विवाहित मुलगी प्रियांका इंगळे (२८), नात सृष्टी इंगळे (२) अशी मृतांची नावे आहेत. विष्णू जोशी यांची दोन मुले मनीष (वय २५) आणि सूरज (२२) हे दोघे प्रसंगावधान राखून गॅलरीतून बाहेर पडल्याने बचावले. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Four killed in fire in Vita city)

विटा येथे सावरकरनगर येथे विष्णू जोशी यांचे जय हनुमान स्टील सेंटर हे भांडी आणि फर्निचरचे मोठे दुकान आहे. दुकान तळमजल्यावर असून पहिल्या मजल्यावर जोशी कुटुंब रहात होते. दुकानातून वर घरी जाण्यासाठी जीना आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या आतील बाजूस आग लागली. यावेळी दुकानाची दोन्ही शहर आतून बांद होती. जोशी कुटुंबातील सहा सदस्य हे पहिल्या मजल्यावर होते. आग झपाट्याने पसरली त्यामुळे भांड्याच्या दुकानातून जोशी कुटुंबातील सदस्यांना जिन्यावरुन बाहेर पडता आले नाही. तरीही काही तरुणांनी शेजारच्या इमारतीच्या टेरेसवरुन गॅलरीतून मनीष आणि सूरज या दोन भावांना बाहेर काढले. आगीने रौद्र रुप घेतल्याने जोशी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. (Four killed in fire in Vita city)

आगीचे वृत्त कळताच घटनास्थळी विटा, कडेगाव, पलूस, तासगाव आणि कुंडल येथील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. चार ते पाच तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली. जोशी कुटुंबातील सदस्यांना वाचवण्यासाठी तरुणांनी मोठ्या धाडसाने प्रयत्न केले. तरुणांनी भिंतीला भगदाड पाडून इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण चौघांचा होरपळून मृत्यू झाला. घटनास्थळी आमदार सुहास बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील घटनास्थळी थांबून होते. खासदार विशाल पाटील आणि पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.  (Four killed in fire in Vita city)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?