नवी दिल्ली : नेपाळमधील सत्तांत्तरानंतर माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओलींना पोलिसांनी अटक केली आहे. नवनिर्वाचित पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी शुक्रवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान ओली यांना अटक झाल्याने नेपाळमध्ये खळबळ उडाली आहे.
नवनियुक्त पंतप्रधान असून ते रॅपर आहेत. गेल्या वर्षी जेन जी आंदोलनातून त्यांचे नेतृत्व वेगाने पुढे आले होते. ३५ वर्षी पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी गतवर्षी झालेल्या आंदोलनाच्यावेळी दडपशाही प्रकरणाचा चौकशी अहवाल स्वीकारला. त्यानंतर शनिवारी पहाटे पोलिसांनी कारवाई केली. भक्तपूर जिल्ह्यातील गुंडू येथील राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेण्यात आली. तसेच माजी गृहमंत्री आणि नेपाळी काँग्रेसचे नेते रमेश लेखक यांनाही अटक करण्यात आली. (Former Nepali Prime Minister Oli Arrested)
गेल्यावर्षी नेपाळमध्ये जेन झी आंदोलनात हिंसाचार झाला होता. त्यामध्ये ६० लोकांचा मृत्यू झाला. हे आंदोलन दडपल्याचा ठपका माजी पंतप्रधान ओली यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पण पंतप्रधानपदाची सुत्रे स्वीकारताच ओली यांना अटक केली. (Former Nepali Prime Minister Oli Arrested)
काठमांडू पोस्ट ने दिलेल्या वृत्तानुसार संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष न्यायालयाचे माजी न्यायाधीश गौरी बहाद्दूर कार्की यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय चौकशी आयोग नेमला आहे. या आयोगाने सखोल अभ्यास करुन अहवाल सादर केला होता. (Former Nepali Prime Minister Oli Arrested)