युद्धामुळे अमेरिकेत खतांच्या किंमती वाढल्या

Fertilizer prices in the United States rose due to the war

नवी दिल्ली : इराण युध्दामुळे अमेरिकेत खतांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे अमेरिकन शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. इराण युद्धामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय होऊ लागला आहे. इंधन, नैसर्गिक वायू आणि खतांची वाहतूक मंद झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत खते महागली असल्याने तिथल्या शेतकऱ्यांना खतांच्या किंमतीचा सामना करावा लागत आहे. (Fertilizer prices in the United States rose due to the war)

२८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ले सुरू केल्यापासून खतांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. होर्मुझच्या समुद्र्धुनीतून होणाऱ्या जलवाहतुकीत घट झाली आहे. हा मार्ग जगातील २० टक्के तेल आणि नैसर्गिक वाहतुकीसाठी महत्वाचा मार्ग आहे. त्याचा परिणाम इंधन आणि खत उत्पादन या दोन्हीवर होत आहे. (Fertilizer prices in the United States rose due to the war)

इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे उत्पादन खर्च वाढत आहे. तर जलवाहतूक कमी झाल्यामुळे पर्शियन आखातातून नायट्रोजन खतांची निर्यात मंदावली आहे. महत्वाच्या कच्चा मालाची उपलब्धता मर्यादित झाली आहे. त्यांचा परिणाम अमेरिकन शेतीवर झाला आहे. अमेरिकन फार्म ब्युरो फेडरेशनच्या मते, अमेरिकेच्या खत आयातीपैकी सुमारे १५ टक्के आयात मध्यपूर्वेतून होते. हा प्रदेश जगाला लागणाऱ्या युरियापैकी अर्धा अमोनियापैकी जवळपास ३० टक्के पुरवठा करतो. (Fertilizer prices in the United States rose due to the war)

Related posts

मंत्रीपदाच्या बोलीवर बच्चू कडूच्या हाती धनुष्यबाण!

काँग्रेसची माघार; विधान परिषद निवडणूक बिनविरोध  

गोकुळ संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास उच्च न्यायालयाचा नकार