Fake teacher : नागपुरात ५८० बोगस शिक्षक भरतीत कोट्यवधीचा चुना

Fake teacher

Fake teacher

नागपूर : प्रतिनिधी :  नागपूरमध्ये ५८० बोगस शिक्षक भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. नागपूर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला असून शिक्षण उप संचालक कार्यालयातील तिघांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील संशयितांची साखळी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यावर त्याची बोगस सही करुन १०० हून अधिक शिक्षकांची भरती केल्याचा आरोप महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केला आहे. आपल्याच होम ग्राऊंड असलेल्या नागपूरमध्ये ५८० बोगस शिक्षक भरतीची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. (Fake teacher)

१०० कोटींचा घोटाळा

५८० शिक्षकांच्या भरतीत घोटाळा झाला असून नागपूर विभागात १०० कोटींचा शासकीय निधीचा अपहार झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी सुरू केली असून नागपूर शिक्षण उप संचालक कार्यालयातील अधीक्षक निलेश शंकरराव मेश्राम, शिक्षण उप निरीक्षक संजय शंकरराव दुधाळकर, वरिष्ठ लिपिक सूरज पुंजाराम नाईक यांना अटक केली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त राहूल मदने यांनी दिली. (Fake teacher)

शिक्षक नसतानाही शालार्थ आयडी देण्याचा प्रताप

शिक्षण उप संचालक कार्यालयाला शालार्थ आयडी देण्याचा अधिकार आहे. पण शिक्षक नसतानाही शालार्थ आयडी देण्याचा प्रताप शिक्षण उप संचालकाने केला आहे. तसेच त्या शिक्षकाला मुख्याध्यापकपदीही पदोन्नती दिली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून शिक्षण उपसंचालक उल्हास नरड याला अटक केली आहे. ज्यांना शिक्षकाचा अनुभव नाही त्या पराग पुंडकांना मुख्याध्यापकपदी बढती दिली आहे. (Fake teacher)

मृत अधिकाऱ्यांच्या बोगस सहीने १०० शिक्षकांना ऑर्डर

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष माजी शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांनी १०० शिक्षकांना मृत शिक्षणधिकाऱ्याच्या बोगस सहीने ऑर्डर दिल्या आहेत, असा आरोप केले आहेत. २०१६ मध्ये नागपूर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर सोमेश्वर नैताम कार्यरत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने धाड टाकून मोठ्या रक्कमेसह त्यांना अटक केली. त्यानंतर काहीच दिवसात त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर शिक्षक भरतीत घोटाळा करणाऱ्या मंडळींनी बोगस सह्या असलेल्या अप्रुव्हल ऑर्डरवर बोगस शिक्षक नियुक्ती वापरण्यात आल्या. २०२४ पर्यंत त्यांच्या नावाने ऑर्डर काढण्यात आल्या. सोमेश्वर नैताम यांच्या मृत्यूनंतर लाखो रुपये घेऊन बोगस शिक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या. या नियुक्ती सोमेश्वर नैताम हयात असताना असल्याचे भासवून त्यांच्या मृत्यूपूर्वीच्या मागील तारखा टाकून नैताम यांच्या बोगस सह्या करण्यात आल्या आहेत. (Fake teacher)

एका शिक्षक नियुक्तीसाठी २५ ते ३० हजार रुपये दर

५८० शिक्षकांची भरती बेकायदेशीर आणि बोगस पद्धतीने केली आहे. एका नियुक्तीसाठी २५ ते ३० लाख रुपये घेऊन बोगस भरती करण्यात आली आहे. बनावट शालार्थ ओळखपत्राद्वारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करुन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांकडून बोगस शिक्षक भरतीची चौकशी सुरू झाली असून बोगस शिक्षकांच्या बँक खात्यावर आतापर्यंत किती पगार जमा झाला आहे याची तपासणी केली जाणार आहे. बोगस शिक्षक भरती प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. (Fake teacher)

निलेश मेश्राम मुख्य आरोपी, ५० कोटी कमावले?

शिक्षक भरती घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश मेश्राम आहे. निलेश मेश्रामची एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये शिक्षक भरतीतील बोगस कागदत्रांसंबधित उल्लेख आहे. नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये ५८० बोगस शिक्षकांची भरती केली आहे. बोगस नियुक्त्यामुळे त्यांना सरकारकडून वेतन दिले जाते. वेतनापोटी सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुना लागला आहे. शिक्षण विभागाने घोटाळा झाल्याचे मान्य केले आहे. बोगस शिक्षक भरतीतील मुख्य सुत्रधार मेश्राम याने जवळपास ५० कोटी रुपयांची संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. (Fake teacher)

हेही वाचा :

चोक्सीला आणायचे आहे की त्यालाच यायचे आहे?

भिडेंना चावला कुत्रा, त्याचा गावभर बभ्रा…

सोनिया, राहुल यांच्याविरूद्ध आरोपपत्र

‘ईडी’कडून मनी लॉड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वड्रांची चौकशी

Related posts

Raju Shetty : काटामारीवर आळा घालण्यासाठी ‘एआय’ वापर करा

Hindi optional: हिंदी सक्तीबाबत सरकार बॅकफूटवर!

Terror attack in J&K: पर्यटकांवर दहशतवादी हल्ला; २० वर जखमी