Fadnavis: वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री म्हणाले…

Fadnavis

Fadnavis

सातारा : रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक सध्या चर्चेत आहे. या स्मारकाला कसलाही ऐतिहासिक संदर्भ नाही, असे इतिहास अभ्यासकांचे मत आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी भारतीय पुरातत्व विभागाला हे स्मारक हटवण्यासंबंधी पत्र दिले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.(Fadnavis)

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबत सर्वांनी एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढला पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले. प्रत्येक गोष्टीत वाद करायचे कारण नाही. या स्मारकासंबंधी चर्चेतून मार्ग निघू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. (Fadnavis)

ते म्हणाले,  “या स्मारकासाठी होळकरांनी पैसे दिले आहे. हे स्मारक हटवायचे असेल तर सगळ्यांशी चर्चा करावी लागेल. हे स्मारक असे कसे हटवणार, याबाबत मोठ्या प्रमाणात समाजाचा रोषही आहे. अनेक वर्षे त्या ठिकाणी वाघ्याचा पुतळा आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वांशी चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो. प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असे नाही,’’

यासंदर्भात सर्वांनी बसून मार्ग काढावा. वाद करण्याचे किंवा वाढवण्याचे कसलेही कारण नाही. यासंदर्भात दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. एका बाजूला धनगर समाज आणि दुसरीकडे मराठा समाज वेगळा असे काही नाही. सगळे समाज एकमेकांसोबत आहेत. त्यामुळे या बाबतीत वाद अयोग्य आहे, बसून मार्ग काढला पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. (Fadnavis)

रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्यास धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे इतिहास अभ्यासकांच्या मते, या कुत्र्याला कसलाही ऐतिहासिक आधार नसल्याचे सांगितले जात आहे. संभाजीराजे यांनी राज्य सरकार तसेच भारतीय पुरातत्व विभागाला पत्र देऊन हे स्मारक हटवण्याची मागणी केली आहे.

संभाजीराजेंनाच वेळ मिळत नाही वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही, असे वक्तव्य संभाजीराजे यांनी अलीकडेच केले होते. त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, माजी खासदार संभाजीराजे यांना मी भेटीसाठी अनेकदा वेळ दिली आहे. ते माझ्याशी फोनवर बोलतात. मला येऊन भेटतातही. त्यामुळे त्यांना वेळ न मिळण्याचा विषयच नाही.

हेही वाचा :
 अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले

Related posts

JD Vance Visit

JD Vance Visit: ट्रम्प यांचा वर्षअखेरीस भारत दौरा

Athani murder

Athani murder : खून डोंगरावर, क्लू जयसिंगपूरमध्ये, आरोपी अथणीत

Team Khandoba

Team Khandoba: ‘खंडोबा’ उपांत्य फेरीत, ‘सम्राटनगर’ पराभूत