माझा संबध असेल तर मी राजीनामा देईन; झिरवाळांचे लाचप्रकरणी स्पष्टीकरण

Explanation of Jirwals in bribery case

नवी दिल्ली : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लार्क राजेंद्र ढेरंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले. या घटनेने खळबळ उडाली असून याबाबत या खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. खरंच माझ्याशी लिंक जोडली असेल तर मी राजीनामा देईन असे त्यांनी जाहीर केले आहे. (Explanation of Jirwals in bribery case)

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ तीन दिवस दिल्लीत होते. त्यांच्या गैरहजेरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून क्लार्कला अटक केली. या प्रकरणानंतर संबधित क्लार्कची केबिन सील करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्र्यांना काम करण्यापासून अटक केल्याची चर्चा आहे. मात्र असं काहीही नाही असे झिरवाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Explanation of Jirwals in bribery case)

दिल्लीहून मुंबईत परतण्यापूर्वी आज शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री झिरवाळ म्हणाले, लाच प्रकरणाची माझीही जबाबदारी आहे. या कर्मचाऱ्याला उत्तर द्यावे लागेल. त्याला कुठेही पाठीशी घालणार नाही. तसेच मी दिल्लीत असल्याने नक्की काय घडले आहे हे मला माहीत नाही. लाचखोरी प्रकरणात आपल्याची संबध असल्याचे सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. (Explanation of Jirwals in bribery case)

Related posts

काँग्रेसची निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने

नेहरुंची मोदीशी तुलनाच होऊ शकत नाही

भारताची आरोग्य व्यवस्था गंभीर