अल्पसंख्याक मुलींच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्या : सुनेत्रा  पवार 

Expedite the establishment of the engineering college for minority girls

जमीर काझी : मुंबई  :   शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असून चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरात अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामाला गती द्यावी, असे  आदेश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा  पवार मंगळवारी अधिकाऱ्यांना  दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांचा व जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी त्यांच्या  अध्यक्षतेखाली  बैठक झाली. यावेळी  उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील,  राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सना मलिक, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव योगेश म्हसे, जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष मितेश नाहटा आदी  उपस्थित होते. (Expedite the establishment of the engineering college for minority girls)

यावेळी  सुनेत्रा  पवार म्हणाल्या की, अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी राज्य सरकार विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून या प्रयत्नांना अधिक गती देण्यात येणार आहे. विशेषतः मुलींच्या उच्च तांत्रिक शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.बैठकीत ‘मार्टी’ संस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेसाठी स्वतंत्र लेखा उघडणे, कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी मंजूर पदे तात्काळ भरणे, तसेच तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर कार्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. (Expedite the establishment of the engineering college for minority girls)

तसेच अल्पसंख्याक समाजातील तरुणांना आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय झाला. कौशल्य विकास, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रमांद्वारे युवकांना सक्षम करण्यावर सरकारचा विशेष भर राहील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले. (Expedite the establishment of the engineering college for minority girls)

Related posts

मराठी सक्तीचीच या मुख्यमंत्र्यांच्या  घोषणेचे ‘म्यांव’ का झाले?;  संजय राऊतचा हल्लाबोल 

अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ‘व्हीएसआर’ला १४५ कोटींचे वाटप

वाहन चालकांना मराठी भाषेची सक्ती राहणारच :  प्रताप सरनाईक