Ex DGP Murder Case: ‘मी त्या राक्षसाला ठार केले…’

dgp omprakash

बेंगळुरू : कर्नाटकचे निवृत्त पोलिस महासंचालक ओम प्रकाश यांच्या हत्येच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती बाहेर येत आहे. त्यांची पत्नी पल्लवीने त्यांची हत्या करण्याआधी भयंकर कृत्य केले. या दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी पल्लवीने त्यांच्या डोळ्यात चटणी टाकली. ओम प्रकाश यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला असता तिने त्यांच्यावर चाकूचे वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर पल्लवीने तिच्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला. “मी त्या राक्षसाला ठार केले आहे,” असे सांगितले, अशी माहिती या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिली आहे. (Ex DGP Murder Case)

पीटीआयच्या वृत्तानुसार, कर्नाटकातील दांडेली येथील जमिनीच्या प्रकरणातील वाद आणि या जोडप्यामध्ये सुरू असलेल्या वादातून ही हत्या झाली आहे. काही महिन्यांपूर्वी पल्लवीने जमिनीबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी एचएसआर लेआउट पोलिसांकडे संपर्क साधला होता असेही पीटीआयने म्हटले आहे. पण या तक्रारीबद्दल अद्याप ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

पल्लवीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून हत्येची कबुली दिली आहे. या प्रकरणात ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेश याने काही मोठे खुलासे केले आहेत. (Ex DGP Murder Case)

रविवारी (२० एप्रिल) संध्याकाळी बेंगळुरूमधील एचएसआर लेआउट येथे ओम प्रकाश यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला होता. दरम्यान पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवीने फोनवर हत्या केल्याची कबुली दिली. नंतर घटनेवेळी घरात उपस्थित असलेल्या पल्लवी आणि त्यांच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले, पण त्यांचा मुलगा कार्तिकेश तेव्हा घरात नव्हता.

आईकडून वडीलांना धमक्या

पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, कार्तिकेशने हत्येसाठी त्याची आई किंवा बहि‍णीवर थेट आरोप करणे टाळले. तसेच तो घरी परतल्यानंतर त्याच्या वडीलांचा मृतदेह आढळून आला असेही त्याने सांगितले. असे असले तरी, २० एप्रिल २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीत त्याने त्याच्या आईवर आरोप केले आहेत. गेल्या आठवडाभरापासून आईवडीलांना जीवे मारण्याची धमकी देत ​​होती, असे या तक्रारीत म्हटले आहे. या धमक्यांमुळे ओम प्रकाश तात्पुरते त्यांची बहीण सरिता कुमारी यांच्या घरी शिफ्ट झाले होते. घटनेच्या दोन दिवस आधी कृती सरिता कुमारी यांच्या घरी आली होती. तिने ओम प्रकाश यांना घरी परत येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला, असा आरोप आहे. ती ओम प्रकाश यांच्या इच्छेविरोधात त्यांना परत घेऊन आली, असेही सांगितले जात आहे. (Ex DGP Murder Case)

कार्तिकेश सांगितले की, हत्या झाली त्या दिवशी तो डोमलूर येथील कर्नाटक गोल्फ असोसिएशनमध्ये होता, त्यावेळी त्याच्या शेजारी जयश्री श्रीधरन यांनी संध्याकाळी पाचच्या सुमारास त्याला फोन करून त्याचे वडील खाली पडलेल्या अवस्थेत आढळल्याचे सांगितले. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, ओम प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत सापडले होते, त्यांच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा होत्या. त्याच्या मृतदेहाजवळ फुटलेली बाटली आणि चाकू आढळला. त्यांना तातडीने सेंट जॉन्स रुग्णालयात नेण्यात आले. त्याची आई आणि बहीण दोघींही नैराश्याने ग्रस्त होत्या. त्यांचे वडिलांबरोबर नेहमी भांडण होत असे. “मला दाट संशय आहे की मा‍झ्या वडीलांच्या हत्येत त्यांचा सहभाग आहे,” असे कार्तिकेशने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा :
कुरूंदकरने वूडकटरने केले होते अश्विनींच्या मृतदेहाचे तुकडे
पोलिस अधिकारी बिद्रेंच्या खुनाच्या गुन्ह्यात कुरुंदकरला जन्मठेप

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर