तब्बल १५ वर्षानंतर इंग्लंडचा ऑस्ट्रेलियात विजय

England wins in Australia after 15 years

मेलबर्न : तीन कसोटीत पराभव पत्करुन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने कट्टर प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाचा चौथ्या कसोटीत चार गडांनी पराभव करत नाताळ साजरा केला. तब्बल १५ वर्षानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत विजय संपादन केल्याने नववर्षे स्वागत करणाऱ्या इंग्लिश समर्थकात आनंदी वातावरण पसरले आहे. अवघ्या दोन दिवसात कसोटी संपल्याने क्रिकेटप्रेमींची निराशा झाली असली तरी एक चांगल्या खेळाचे प्रदर्शन पहायला मिळाले.

मेलबर्नच्या हिरव्यागार खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी कमाल केली. पहिल्या दिवशी तब्बल वीस गडी बाद झाले तर दुसऱ्या दिवशी सोळा गडी बाद झाले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५२ धावांत संपुष्टात आल्यावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पहिल्या डावात ११० धावात गुंडाळत ४२ धावांची आघाडी घेतली. (England wins in Australia after 15 years)

दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने १३२ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड ४६, कॅमेरुन ग्रीनने १९ धावा केल्या. कर्णधार स्टिव्हन स्मिथ २९ धावांवर नाबाद राहिला. ब्रायर्डन कार्सने चार, कर्णधार बेन स्टोक्सने ३ तर जोश टंग्ने दोन तर गस अटकिन्स एक बळी मिळवला. (England wins in Australia after 15 years)

इंग्लंडला विजयासाठी ऑस्ट्रेलियाने १७५ धावांचे आव्हान दिले. इंग्लंडच्या सलामीची जोडी झॅक क्रॉवले आणि बेन डेकेटने धडाकेबाज खेळी करत ५१ धावांची सलामी दिली. बेन डकेटने चार चौकार आणि एक षटकार ठोकत ३२ धावा केल्या. त्यानंतर क्राउले बाद झाला. त्याने तीन चौकार एक षटकार मारत ३७ धावा केल्या. ब्रायडन कार्स सहा धावांवर बाद झाला. जॅकोब बेथेलने संयमी फलंदाजी करत सर्वाधीक ४० धावा केल्या. त्याने पाच चौकार मारले. जो रुटने १५ तर हॅरि ब्रुकने १८ धावा करत संघाच्या विजयात योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क, रिचर्डसन आणि बोलॅंडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. (England wins in Australia after 15 years)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर