उपचारानंतर एकनाथ शिंदे मुंबईला परतले

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपासून आजारी आहेत. तब्येत बरी नसल्याने ते आपल्या दरे या गावी विश्रांतीसाठी गेले होते. दरम्यान ते ठाण्यात परतले होते. परंतु, प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने ते आज (दि.३) ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

रूग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या काही तपासण्या केल्या. एकनाथ शिंदे यांना ताप आहे. तो कमी-जास्त होत असल्याने अंगामध्ये कणकण आहे. यासह घशातही इन्फेक्शन असल्याने डॉक्टरांनी त्यांच्या काही तपासण्या केल्या. यात डेंग्यू आणि मलेरियाच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांना डॉक्टरांनी रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेतले.  यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. यासोबतच त्यांचा घशाला संसर्ग झाला होता. त्याच्या काही चाचण्या करण्यासाठी ते रुग्णालयात आले होते. त्यांचा एमआरआय, एक्स-रे करण्यात आला. त्यांना थोडा अशक्तपणाही आहे. त्यांचे सर्व रिपोर्ट चांगले आहेत. आम्ही रिपोर्टमध्ये काय हे सांगू शकत नाही. त्यांची प्रकृती आता ठीक आहे. ते काम करु शकतात. आता ते कामासाठीच गेले आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

मंत्र्यांच्या खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदासाठी चढाओढ

उद्धव-राज ठाकरे एकत्र 

Maharashtra Cabinet Portfolio : गृह फडणवीसांकडेच, शिंदेंना नगरविकास, अजितदादांना अर्थ