केरळमचे माजी मुख्यमंत्री विजयन यांच्या घरावर ईडीचे छापे

ED Raids on the Residence of Former Kerala CM Vijayan

नवी दिल्ली : केरळमचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या निवासस्थानावर बुधवारी सकाळी ईडीने छापे टाकले. मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. विजयन यांच्या भाड्याच्या घरासह १२ ठिकाणी ईडीने छापे टाकले आहे. (ED Raids on the Residence of Former Kerala CM Vijayan)

कोचीन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड (सीएमआयएल) आणि माजी मुख्यमंत्री विजयन यांची कन्या वीणा विजयन यांच्या एक्झालॉजिक सोल्युशन यांच्या आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याने कारवाई केली आहे. २०१८ ते २०१९ या कालावधीत वीणा यांच्या कंपनीने एक्सालॉजिक सोल्युशन आयटी कंपनीला १.७२ कोटी रुपयांचे बेकायदेशीर पेमेंट केले आहे. विशेष म्हणजे त्या आयटी कंपनीने त्या कंपनीला कोणतीही सेवा दिली नव्हती. ED Raids on the Residence of Former Kerala CM Vijayan)

या संदर्भात केरळम उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाईला आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. पण ही याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर ईडीने छापे टाकले. ईडीने २०१४ मध्ये पीएमएल अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. हा मुद्दा विजयन सरकारच्या काळातील सर्वात मोठा वादग्रस्त मुद्दा राहिला होता. ED Raids on the Residence of Former Kerala CM Vijayan)

Related posts

वैभव सूर्यवंशीचे शतक हुकल्याने क्रिकेटशौकीन हळहळले

राज्यात जनगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू

‘काँग्रेस’ची पंढरपूर वारीच्या कालावधीत ‘एसआयआर’  कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी