ईडीकडून तृणमुल संबधित आय पीएससी कार्यालयावर छापे

ED raids a Trinamool-linked organization

नवी दिल्ली :   अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी राजकीय सल्लागार कंपनी इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (आय-पीएसी) च्या साल्ट लेक कार्यालयावर आणि संस्थेचे  प्रमुख प्रतीक जैन यांच्या निवासस्थानी छापा टाकला. आय-पीएसी टीएमसी पक्षाचे राजकीय खाते हाताळते. छाप्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, ईडीच्या पथकाने आय-पीएसी कार्यालयातून टीएमसीशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. ममता बॅनर्जी ईडीकडून ती कागदपत्रे घेऊन त्यांच्या गाडीत घेऊन गेल्याची माहिती पुढे आली आहे. . तृणमुलने हे सूडाचे कृत्य असल्याची टीका केली आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आय-पीएसीची स्थापना केली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून ही फर्म तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि बंगाल सरकारसोबत काम करत आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत टीएमसीच्या सत्तेत पुनरागमन आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या यशात आय-पीएसीने महत्त्वाची भूमिका बजावली. प्रशांत किशोर सध्या पूर्णवेळ राजकारणात सक्रिय आहेत. प्रशांत किशोर आणि आय-पीएसी यांनी भाजपला राजकीय सल्ला देखील दिला आहे. (ED raids a Trinamool-linked organization)

राज्यात विधानसभा निवडणुका सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच हे छापे टाकण्यात आले आहेत. तीन महिन्यानंतर होणाऱ्या निवडणूकीत तृणमुल काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट सामना होणार आहे. ईडीने कारवाई केली असली तरी तृणमूल काँग्रेस चौथ्यांदा सत्तेत परत येईल असे अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले आहे. छाप्याच्या वेळी प्रतीक जैन त्यांच्या चौथ्या मजल्यावरील निवासस्थानी होते आणि त्यांची चौकशी सुरू होती. गुरुवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. गुरुवारी पहाटे सुरू झालेले हे छापे साल्ट लेकमधील एका इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील आय-पीएसी कार्यालय, लाऊडन स्ट्रीटवरील जैन यांचे निवासस्थान आणि बुर्राबाजारमधील पोस्ता येथील आणखी एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर टाकण्यात आले. (ED raids a Trinamool-linked organization)

पत्रकारांशी बोलताना ममता बॅनर्जी यांनी हे छापे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या: “हे सर्व गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यावरून घडत आहे. माझ्या पक्षाबद्दल माहिती गोळा केली जात आहे. ईडीचा हा छापा माझ्या पक्षाच्या अंतर्गत राजकीय साहित्यापर्यंत पोहोचण्यासाठी होता. उमेदवारांची यादी, पक्षाची रणनीती, योजना आणि गोपनीय कागदपत्रे घेण्यासाठी ईडी आमच्या कार्यालयात आली हे अत्यंत दुर्दैवी आहे.” सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय हस्तक्षेप आणि तपास यंत्रणांच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त करून तृणमूल काँग्रेस राज्य आणि राष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करण्याची योजना आखत आहे. (ED raids a Trinamool-linked organization)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर