Dr. Anand Patil :  डॉ. आनंद पाटील यांच्या तीन ग्रंथाचे चार डिसेंबरला प्रकाशन

Dr. Anand Patil

कोल्हापूर : प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तुलनाकार, संशोधक आणि सुमारे ६५ इंग्रजी मराठी पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ. आनंद पाटील यांच्या तीन ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ४ डिसेंबर रोजी होणार आहे. देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. भाषा तज्ज्ञ आणि समिक्षक प्रा. डॉ. गणेश देवी आणि राजकीय अभ्यासक प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा होणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून निर्मिती साहित्य सेवेब‌द्दल भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष व शिवाजी वि‌द्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दिली. (Dr. Anand Patil)

यावेळी उत्सव समितीच्या सचिव प्रा. डॉ मनीषा पाटील, डी. वाय पाटील वि‌द्यापीठ नवी मुंबई चे माजी कुलसचिव डॉ. बी. एम. हिर्डेकर, समिती सदस्य डॉ. बी. पी. साबळे, डॉ. व्ही व्ही भोसले, डॉ. भालबा विभुते, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील आदी उपस्थित होते. (Dr. Anand Patil)

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने जागतिकरणात सांस्कृतिक अभ्यासांचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन ‘सांस्कृतिक मीमांसा’ प्रकल्पाची जबाबदारी डॉ. आनंद पाटील यांच्यावर सोपवली होती. डॉ. आनंद पाटील यांनी ‘सांस्कृतिक मीमांसाः समाज, संस्कृती आणि साहित्य’, ‘जगभराचे सांस्कृतिक सिद्‌धांतः उपयोजनांच्या नव्या दिशा’ आणि ‘सांस्कृतिक अभ्यासः जुने, नवे आणि भवितव्य असे २१०० पृष्ठाचे तीन खंड लिहिले असून त्याचे प्रकाशन होणार आहे. (Dr. Anand Patil)

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार