Double voter in Mumbai : ..तर निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा : आदित्य ठाकरे

Double voter in Mumbai

जमीर काझी : मुंबई :  विधानसभा निवडणुकीत बोगस आणि दुबार मतदार झाल्याचा विरोधकांचा आरोप कायम असताना मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादीतील त्रुटी आणि मोठा घोळ केला आहे. तो दूर करून निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया घेण्यात यावी, अन्यथा निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आ.आदित्य ठाकरे यांनी सोमवारी केली.

   मुंबई महापलिका निवडणुकीच्या पाश्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या मतदार यादीत दोन लाखावर दुबार नावे आहेत, वार्डमधील अनेक नावे बदलण्यात आली आहेत, हा घोळ तातडीने दुरुस्ती केला जावा, यासाठी त्यांनी मनसेच्या नेत्यांसमवेत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेऊन संयुक्तपणे निवेदन दिले. शिष्टमंडळात त्यांच्यासह बाळा नांदगावकर, अंबादास दानवे, अनिल परब आदीचा समावेश होता. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,’

विरोधकांच्या प्रभागातील मतदान याद्यात बदल

अजूनही अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ आणि गोंधळ आहे. नवीन प्रारुप मतदार यादी आयोगाने २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली. यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या वार्डातील मतदार याद्या हलवल्या गेल्या नाहीत.मात्र विरोधकांच्या प्रभागातील मतदान याद्या या हलवल्या आहेत. त्यामुळ निवडणूक आयोग हे सरकारच्या सांगण्यानुसार काम करत आहे. जर लोकशाही पद्धतीने निवडणुका होत नसतील आणि निवडणूक आयोग चुकीचं काम करत असेल तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा,” (Double voter in Mumbai)

एका दुकानात ४८ मतदार

निवडणूक आयोगाने मुंबईतील प्रारुप यादी २० तारखेला आणल्यानंतर अजूनही मतदार याद्यांमध्ये घोळ आणि गोंधळ आहे. एका दुकानात ४८ मतदार दाखवले आणि जर एका घरात १० पेक्षा जास्त लोक राहात असतील तर आयोगाने तेथे जाऊन तपासले पाहिजे. आम्ही नवीन प्रारुप याद्यांमध्ये काही प्रभागांचा शोध घेतला तर ८ लाख ३२ हजार मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. तो आधी दुरुस्त करा आणि निवडणुका लोकशाही पद्धतीने घ्या. जर हा घोळ असाच ठेवून पालिका निवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाने जाहीर केली, तर निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी करून ठाकरें म्हणाले,’. पुन्हा सर्व याद्या सुरळीत करून घेण्यासाठी आयोगाने २१ दिवस घ्यावेत किंवा निवडणूक रद्द करावी. तुम्ही ५ डिसेंबर २०२५ रोजी एक यादी प्रसिद्ध कराल आणि नियमाप्रमाणे आम्ही सगळं केलं असं सांगून स्वतःचं समाधान कराल, पण हे चुकीचं होईल. (Double voter in Mumbai)

दुबार मतदार यादी सुधारा

आयोगाने जे संभाव्य दुबार मतदान यादीबाबत हमीपत्र तयार केलं आहे. ते म्हणजे एका दिवशी एक व्यक्ती एका शहरात पुन्हा मतदान करू शकणार नाही. पण जर दुसऱ्या ठिकाणी वेगळ्या तारखेला निवडणुका असतील तर ती व्यक्ती मतदान करु शकते. म्हणून जे हमीपत्र बनवले आहे. त्यात तारीख आणि ठिकाणी नमूद करावे आणि दुबार मतदान करता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख करावा. म्हणजे संभाव्य दुबार मतदार यादी आहे, ती सुधारली पाहिजे. (Double voter in Mumbai)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर