Data leak : १६ अब्ज पासवर्ड लीक; तुमचा तर नाही?

Data leak

नवी दिल्ली : तुम्ही समाजमाध्यमांवर सक्रीय असाल तर सावधान! मोठ्या प्रमाणात डेटाचोरी आणि पासवर्ड लीकचे प्रकार उघडकीस आले आहे. सायबर सुरक्षातज्ज्ञांनी ३०  डेटाबेसमध्ये १६ अब्ज लॉगिन क्रेडेन्शियल्सचे पासवर्ड लीक झाल्याची धक्कादायक माहिती उघड केली आहे. (Data leak)

एवढ्या मोठ्या प्रमाणात डेटा लिकचा प्रकार उघडकीस आल्यामुळे फेसबुक, इंस्टाग्राम, जीमेल, अॅपल आणि इतर असंख्य सेवांसह प्रमुख प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जानेवारी २०२५ पासून सायबरन्यूजच्य संशोधकांनी डेटा लिकच्या प्रकरणांचा तपास सुरू केला आहे. या तपासादरम्यान शोधून काढलेला इतिहासातील हा सर्वांत मोठा क्रेडेन्शियल लीकचा प्रकार आहे.

या संशोधकांना संबंधित मालकांची ओळख पटवता आली नसली तरी चोरीला गेलेल्या डेटाचा प्रचंड साठा लॉक होण्यापूर्वी असुरक्षित डेटाबेसद्वारे यात प्रवेश केला गेला. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे जवळजवळ सर्व डेटासेट पूर्वी रिपोर्ट न दिलेले होते. मे महिन्यात वायर्ड मासिकाने यापूर्वी असा फक्त १८४ दशलक्ष रेकॉर्ड डेटाबेस उघड केला होता. (Data leak)

लीक झालेले क्रेडेन्शियल्सचा वापर जवळजवळ प्रत्येक प्रमुख ऑनलाइन सेवेसाठी केला जातो. त्याच्याच आधारे मोठे फ्रॉड केले जाऊ शकतात. त्यासाठीची ती ब्लूप्रिंटच असते, असे संशोधन पथकाचे म्हणणे आहे. डेटाबेसमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियासाठी लॉगिन माहिती, जीमेलसह ईमेल सेवा, गिटहब सारखे डेव्हलपर प्लॅटफॉर्म, टेलिग्राम सारखे मेसेजिंग अॅप्स, व्हीपीएन सेवा आणि अगदी सरकारी पोर्टलसाठी लॉगिन माहिती असते. (Data leak)

चोरी केलेला डेटा ऑनलाइन गुन्ह्यांत वापरला जाऊ शकतो.

या पार्श्वभूमीवर सायबरन्यूज संशोधकांनी सर्व यूजर्सना इशारा दिला आहे. दर काही आठवड्यांनी नवीन मोठ्या प्रमाणात डेटासेट उदयास येतात. ते आजच्या डिजिटल लँडस्केपमध्ये इन्फोस्टीलर मालवेअरचे व्यापक स्वरूप स्पष्ट करतो. विशेषतः टोकन, कुकीज आणि मेटाडेटासह अलीकडील लॉगचा समावेश हा डेटा मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन नसलेल्या संस्थांसाठी धोकादायक ठरतो.

वापरकर्त्यांनी सजग राहण्याची गरज जागतिक स्तरावर अंदाजे ५.५ अब्ज लोकांकडे इंटरनेट अॅक्सेस आहे. त्यामुळे डेटा लिकचे प्रकार मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. तशी किंचितशी शंका जरी वाटली तरी लगेच पासवर्ड बदलावा, शक्य असेल तेथे मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन सक्षम ठेवावे आणि मजबूत पासवर्ड ठेवावा, अशी शिफारस सायबर तज्ज्ञांनी केली आहे.

हेही वाचा :
क्लायंटला सल्ला दिला म्हणून ईडीची वकिलाला नोटीस
न्या. वर्मांच्या स्टोअररूममध्ये नोटांचे बंडल्स होते

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी