ED Withdraws Summons : क्लायंटला सल्ला दिला म्हणून ईडीची वकिलाला नोटीस

ED Withdraws Summons

नवी दिल्ली : क्लायंटला कायदेशीर दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी एका वरिष्ठ वकिलाला अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावली. या संताजनक प्रकारानंतर वकील संघटनेने सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहिले. त्यानंतर ईडी हे समन्नस तत्काळ मागे घेतले. (ED Withdraws Summons)

ज्येष्ठ विधिज्ज्ञ प्रताप वेणुगोपाल यांना हे सम समन्स बजावण्यात आले होते. याआधी असेच समन्स आणखी एक ज्येष्ठ विधिज्ज्ञ अरविंद दातार यांना बजावण्यात आले होते. आता हा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे.

या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी, १८ जून रोजी ईडीने वेणुगोपाल यांना समन्स बजावले होते. रेलिगेअर एंटरप्रायझेसच्या माजी अध्यक्षा डॉ. रश्मी सलुजा यांना जारी केलेल्या ईएसओपी (कर्मचारी स्टॉक ओनरशिप) वर मेसर्स केअर हेल्थ इन्शुरन्सला वेणूगोपाल यांनी कायदेशीर सल्ला दिला होता. म्हणून हे समन्स बजावले होत. याआधी वरिष्ठ वकील अरविंद दातार यांनाही असेच समन्स बजावण्यात आले होते; तथापि, नंतर ते मागे घेण्यात आले. (ED Withdraws Summons)

शुक्रवारी (२० जून) सर्वोच्च न्यायालयाच्या अ‍ॅडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशनने या घटनेचा निषेध केला. तसेच भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांना पत्र लिहून ईडीच्या कारवाईचा निषेध केला. वेणुगोपाल यांना समन्स बजावल्याची स्वतःहून दखल घेण्याची मागणी केली. ईडीच्या कारवाईमुळे कायदेशीर व्यवसायाच्या स्वातंत्र्यावर आणि वकील-क्लायंट विशेषाधिकाराच्या मूलभूत तत्त्वावर गंभीर परिणाम होत असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. पत्रात अन्य मुद्द्यांकडेही लक्ष वेधले आहे. (ED Withdraws Summons)

(i) सद्भावनेने दिलेल्या सल्ल्यासाठी कायदेशीर व्यावसायिकांना जारी केलेल्या अशा समन्सची वैधता आणि योग्यता तपासणे आणि

(ii) वकील-क्लायंट विशेषाधिकाराचे आणखी नुकसान टाळण्यासाठी आणि बारचे स्वातंत्र्य राखण्यासाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे. वकील संघटनांकडून झालेला निषेध आणि सरन्यायाधीशांना लिहिल्याच्या वृत्तानंतर लगेचच, ईडीच्या सहाय्यक संचालकांनी (मुंबई) समन्स तत्काळ मागे घेतले. या समन्सनुसार वेणुगोपाल यांना २४ जून रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा :
ठाकरे-शिंदेंचा कलगी तुरा… कौन जीता कौन हारा ?
न्या. वर्मांच्या स्टोअररूममध्ये नोटांचे बंडल्स होते

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर