Danave attacks Mahayuti: शेतकरी आत्महत्यांवरून दानवेंचा सरकारवर हल्लाबोल

Danave attacks Mahayuti

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महायुती सरकारच्या धोरणामुळे गेल्या ३ वर्षांत २ हजार ८६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यात सर्वांत जास्त आत्महत्या या अमरावती व मराठवाडा विभागात झाल्याची माहिती देत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहात सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Danave attacks Mahayuti)

पीक विम्याची रखडलेली थकबाकी, बोगस बी बियाणे, शेतमालाला मिळत नसलेला हमीभाव, युरियामध्ये होत असलेली भेसळ, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दानवे यांनी आक्रमक भूमिका मांडली.

कृषी विभागातील शेतकऱ्यांचे रखडलेले प्रश्न आणि शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार यावरून सरकारचे कृषी आणि शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप करून  दानवे म्हणाले की, महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांनी त्यांच्या संकल्पपत्रात कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र सत्तेत आल्यावर त्यांना त्याचा विसर पडला. तसेच कृषी मंत्र्यांनी शेतकरी व स्वतःच्या खात्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून दानवे यांनी सरकारवर टीका केली. (Danave attacks Mahayuti)

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांचे कर्ज माफ केले होते. मात्र आता शेतकऱ्यांचे सिबिल बघितल्याशिवाय कर्ज मंजूर होत नाही. त्यामुळे पीक कर्ज घेताना शेतकरी मेटाकुटीला येतात. एकीकडे केंद्राने बड्या उद्योगपतींचे ९ लाख २६ हजार कोटी रुपये माफ केले मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप दानवे यांनी केला. (Danave attacks Mahayuti)

कीटकनाशके, बी बियाणे व खते यांच्या गुणवत्ता तपासणीसाठी ११३४ गुणवत्ता निरीक्षकांची आवश्यकता असताना ४७८ लोकांनाच गुणवत्ता निरीक्षकपदी नेमण्यात आले. केंद्र सरकारच्या अस्थिर कांदा धोरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन व पाकिस्तानचा कांदा इतर देश आयात करू लागले, त्यामुळे कांद्याचे भाव कमी होऊ लागले याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे  दानवे म्हणाले.

परभणीतील सचिन जाधव या शेतकरी व त्याच्या पत्नीने मुलासह केलेली आत्महत्या, आदर्श पुरस्कार प्राप्त शेतकरी कैलास नागरे या तरुण शेतकऱ्याने केलेली आत्महत्या तसेच बैल नसल्याने शेतकऱ्याला करावी लागलेली नांगरणी या शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

हेही वाचा :
एकनाथ शिंदेंकडून ‘जय महाराष्ट्र’सह ‘जय गुजरात’ घोषणा!
शाहांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप बाहेर : संजय राऊत
शिंदे गुजरात आणि शाहांचे गुलाम : सपकाळ

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर