गांधीनगरातील घुसखोर बांग्लादेशींना सक्तमजुरीची शिक्षा

Bangladeshis sentenced to forced labor

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर येथील छोट्या व्यापारी शहरात बेकायदेशीरपणे प्रवेश करुन वास्तव्य करणाऱ्या दोन बांग्लादेशींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.व्ही.उत्पात यांनी तीन वर्षे आठ महिन्याची सक्तमजुरीची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. सोहेल कलाम मुल्ला उर्फ मोहमंद इनामुल फकीर (वय ३३, रा.जिकरगाछा,जि.पोलिस स्टेशन मणीरामपूर,देश बांग्लादेश) आणि सुमेय्या बादशाहा मुल्ला (२६, रा.बडदे महाजन, जि. नोडाई, पोलिस ठाणे लोहगड, बांग्लादेश) अशी शिक्षा झालेल्या बांग्लादेशी घुसखोरांची नावे आहेत. (Bangladeshis sentenced to forced labor)

सोलापूर दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई

या खटल्याची माहिती अशी की, गांधीनगर येथील कोयना कॉलनी येथील शशिकांत इंगवले यांच्या घरी बांग्लादेशी रहात असल्याची माहिती सोलापूर दहशतवादी विरोधी पथकाला मिळाली. १९ जानेवारी २०२३ रोजी सोलापूर आणि गांधीनगरी पोलिसांनी बांग्लादेशी सोहेल मुल्ला आणि सुमेय्या मुल्ला या दोघांना ताब्यात घेतले. भारताच्या सीमेवर नोंदणी अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त पासपोर्टशिवाय भारतात बेकायदशीर आणि घुसखोरी मार्गाने प्रवेश केल्याबद्दल गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करुन त्यांना अटक केली. गांधीनगर पोलिस ठाण्यातील अशोक पवार यांनी फिर्याद दिली होती. पोलिस उप निरीक्षक विवेकानंद राळेभात यांनी तपास केला. त्यानंतर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. (Bangladeshis sentenced to forced labor)

कोर्टात आठ साक्षीदार तपासले

या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर.व्ही. उत्पात यांच्यासमोर झाली. अतिरिक्त सरकारी वकील प्रतिभा जे.जाधव यांनी आठ साक्षीदार तपासले. साक्षीदारांनी दिलेली साक्ष आणि पुरावे ग्राह्य मानून आणि सरकारी वकील जाधव यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी सोहेल मुल्ला आणि सुमैय्या बागवान यांना तीन वर्षे आठ महिने शिक्षा ठोठावली. तसेच दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास त्यांना दोन महिने कैदेची शिक्षा ठोठावली. (Bangladeshis sentenced to forced labor)

Related posts

उच्च न्यायालयाकडून अवसायनातील दूध संस्था गोकुळ निवडणूकीसाठी पात्र

अंबाबाई मंदिरातील कामांची होणार चौकशी ; समितीची घोषणा

कोल्हापूर शहराला  गुरुवारपासून दररोज पाणी पुरवठा