Damasa Award : दमसा ग्रंथ पुरस्कार जाहीर

Damasa Award

कोल्हापूर : प्रतिनिधी :  दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२४ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी प्रशांत आंबी, द. तु. पाटील, विलास वरे, संतोष मळवीकर, धर्मवीर पाटील, नरहर कुलकर्णी, विनोद गायकवाड, धनाजी घोरपडे आदींच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी २४ मे रोजी सकाळी दहा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

 पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखकांची नावे अशी-

१. देवदत्त पाटील पुरस्कार:बोध- प्रशांत आंबी, (कादंबरी), २. शंकर खंडू पाटील पुरस्कारः शेतसरी- द.तु.पाटील (कथासंग्रह), ३. अण्णा भाऊ साठे पुरस्कारः अंतरंग -विलास वरे (आत्मचरित्र), ४ . कृ. गो. सूर्यवंशी पुरस्कारः संत्याकुली – संतोष मळवीकर (संकीर्ण), ५. शैला सायनाकर पुरस्कारः दिवस कातर होताना- धर्मवीर पाटील (कवितासंग्रह), ६. चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन)- माझ्यातला मला तिला व त्यांना- नरहर कुलकर्णी, ७. महादेव मोरे पुरस्कार; युगांत – विनोद गायकवाड,  ८.रा. रं. बोराडे पुरस्कार : जामिनावर सुटलेला काळा घोडा -धनाजी घोरपडे, ९.  बालवाड्‌मय पुरस्कार- जादूची छडी-संगीता केंजळे

 विशेष पुरस्कार :

१.वंशवेल-संजय परीट, २. टाक डुई डुई -सत्येंद्र कामत, ३. मॅनिफेस्ट-संकेत लाड,  ४. चंद्रपर्व-मारुती फाळके, ५. लावणी रूप आणि अविष्कार आबासाहेब शिंदे, ६. सांजवेळेचे दृष्टांत- उदय निकम, ७. उजेडवाती-गुलाब मोहिते, ८. झुंज सत्ताधिशांची-भिमराव कुंभार, ९. गोष्ट साडेपाच मिलियन डॉलरची-धनाजी माळी १०. पन्हाळा ते विशाळगड व्हाया मुंबई-विनय चोपदार, ११. दावण-विष्णु शिंदे, १२. बनगी आणि बिरमुटं-सुनील दबडे, १३. गडालावळ-विश्वनाथ गायकवाड, १४. रिकाम्या जागा-श्रीनिवास दीक्षित, १५. बीज अंकुरे-माधुरी काजवे, १६. शब्दानंद-आनंदराव जाधव, १७. तुझा माझा रंग-गजानन गायकवाड, १८. आदिम दुःखाचे वर्तुळ-भारती पाटील, १९. ओंकार द बिगिनिंग-संगीता राणे, २०. समृद्ध पालकत्व-आदिती काळमेख, २१. भारतरत्न अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या व्यक्तित्व व कर्तृत्व-अशोक वाडकर, २२. मराठी नवसमीक्षा आणि उद् गम विकास-एच. व्ही. देशपांडे

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह सीमाभागातील मराठी लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. २०२४ या वर्षातील ग्रंथ पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून पाटलोबा पाटील, डॉ. रघुनाथ कडाकणे, डॉ. दत्ता घोलप, गौरी भोगले यांनी काम पाहिले.

पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी २४ मे रोजी सकाळी दहा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. असल्याचे दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. दि. बा. पाटील, आणि कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी कळवले आहे

Related posts

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

रास्त मुद्दे, तरी अवसानघातकी `पवार` वेळ

तुरुंगात जाण्याचं स्वप्न