रोहित पवारांच्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा

Congress supports Rohit Pawar's hunger strike

मुंबई : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून काँग्रेसने आंदोलनाला पाठींबा दिला. राज्य सरकारने जाचक अटी रर्दंद करुन सरसकट कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी रोहित पवारांनी उपोषण सुरू केले आहे.

जोपर्यंत राज्य सरकार सरसकट कर्जमाफी जाहीर करत नाहीत तो पर्यंत अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून महायुतीच्या नेत्यांनी त्याच्या आंदोलनावर टीका सुरू केली आहे. दरम्यान आज काँग्रेस पक्षाने रोहित पवारांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. (Congress supports Rohit Pawar’s hunger strike)

महायुती सरकारची कर्जमाफी फसवी

 टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून जाचक अटींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत, म्हणून संपूर्ण कर्जमाफी करून, सात-बारा कोरा करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरु केलेल्या उपोषणाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांनी केलेल्या मागण्या रास्त आहेत, त्या सरकारने मान्य कराव्यात. रोहित पवार यांच्या उपोषणस्थळी जाऊन मी सुद्धा उपोषण करणार असल्याचे त्यांनी  सांगितले. (Congress supports Rohit Pawar’s hunger strike)

मध्यप्रदेश सरकारने राज्यसभा निवडणूक पुन्हा घ्यावी

  मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार मिनाक्षी नटराज यांचा अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द करून भाजपा व निवडणूक आयोगाने खासदारकी पदरात पाडून घेतली परंतु ज्या नोटीस वरून हा अर्ज बाद करण्यात आला होता ती नोटीसच  तेलंगणातील न्यायालयाने रद्द केली आहे. आता मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्या व नटराजन यांचा अर्ज रद्द करून त्यांचा निवडणूक लढवण्याचा अधिकार हिरावून घेतलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

Related posts

एल निनोचा धोका; १५० ते २०० जिल्हे दुष्काळाच्या छायेत?

यजमान अमेरिकेचा पॅराग्वेवर दणदणीत विजय; कॅनडा,बोस्निया सामना बरोबरीत

हवाई दलाचे विमान कोसळले; पाच जवानांचा मृत्यू