CM JNU speech: भाषा हे संवादाचे माध्यम; वादाचे नव्हे : मुख्यमंत्री

Devendra Fadnavis

नवी दिल्ली : भाषा हे संवादाचे माध्यम आहे, वादाचे नव्हे, असे सांगत मराठी भाषेसह इतर भारतीय भाषा आल्या पाहिजेत, याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी (२४ जुलै) येथे केला. (CM JNU speech)

आपला वाद हा मराठी की हिंदी असा नाहीच. मराठी आहेच, मराठीला पर्यायच नाही. पण मराठीसोबत भारतीय भाषाही महत्त्वाच्या आहेत. मराठी आलीच पाहिजे आणि इतर भारतीय भाषा आल्या पाहिजेत. तमिळ भाषाही समृद्ध भाषा आहे. मातृभाषेचा सार्थ अभिमान असलाच पाहिजे. मराठी माणूस संकुचित विचार करु शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला संकुचित विचार करायला शिकवलेले नाही, असे फडणवीस म्हणाले.(CM JNU speech)

जेएनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राची कोनशिला फडणवीस यांच्याहस्ते बसविण्यात आली. तसेच कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहचतो. मातृभाषा महत्त्वाची आहेच, प्रत्येक मराठी माणसाला मराठी अभिमान, स्वाभिमान आणि आग्रह आहे तो स्वाभाविकच आहे. मातृभाषेचा अभिमान असलाच पाहिजे पण इतरही भारतीय भाषांचा अभिमान आम्ही बाळगला पाहिजे, हेदेखील अत्यंत महत्त्वाचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर