CJ Gavai to inaugurate Circuit Bench : मुख्य सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते उद्या सर्किट बेंचचे उद्घाटन

CJ Gavai to inaugurate Circuit Bench

कोल्हापूर[M1]  : प्रतिनिधी : कोल्हापुरच्या इतिहासात एक सुवर्णपान लिहिले जाणार असून रविवारी १७ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या शुभहस्ते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे, सार्वजनिक आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच न्यायमूर्ती मकरंद कर्णिक हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (CJ Gavai to inaugurate Circuit Bench)

 तब्बल चाळीस वर्षाच्या लढ्याला यश मिळाले असून या घटनेची साक्षीदार होण्यासाठी कोल्हापूरसह, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील वकील, लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा खंडपीठासोबत आता कोल्हापूरचे सर्किट बेंच न्यायव्यवस्थेत नवे स्थान घेणार आहे. (CJ Gavai to inaugurate Circuit Bench)

रविवारी दुपारी तीन वाजता सी.पी.आर.हॉस्पिटल समोरील जुन्या न्यायालय इमारतीमध्ये या सर्किट बेंचचे उद्घाटन भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यक्रम मेरी वेदर मैदानावर होणार आहे. सर्किट बेंचच्या कार्यक्रमानिमित्त कडेकोट बंदोबस्त ठेवला असून पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली साडेआठ पोलिस बंदोबस्तास राहणार आहेत. (CJ Gavai to inaugurate Circuit Bench)

या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे. याआधी या जिल्ह्यांतील नागरिकांना आपली प्रकरणे मुंबईत नेऊन लढावी लागत होती, ज्यासाठी वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा खर्च होत असे.आता मात्र ही प्रकरणे कोल्हापुरातच चालवली जाणार असल्याने सर्वांसाठी मोठी सोय होणार आहे. सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण,जेथे उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती ठरावीक कालावधीत येऊन प्रकरणे चालवणार आहेत. चार न्यायाधीशांची सर्किट बेंचच्या कामकाजासाठी नियुक्ती केली आहे.  या सर्किट बेंचमध्ये नागरी, फौजदारी, कामगार, मालमत्ता, सार्वजनिक हक्क अशा विविध प्रकारचे खटले चालणार आहेत. मात्र कंपनी ॲक्ट, करसंबंधी प्रकरणे आणि एनआयए न्यायालयाशी संबंधित खटले मुंबईतील मुख्य न्यायालयातच चालतील. (CJ Gavai to inaugurate Circuit Bench)


Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर