कोल्हापुरात बालविवाह रोखला

Child marriage prevented in Kolhapur

कोल्हापूर : प्रतिनिधी : चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या मिळालेल्या माहितीनंतर जिल्हा बाल सरंक्षक कक्ष, बाल विकास प्रकल्प आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत कोल्हापुरात बालविवाह रोखला. (Child marriage prevented in Kolhapur)

आज मंगळवारी सकाळच्या सुमारास चाईल्ड हेल्पलाईन १०९  या टोल फ्री क्रमांकावर विक्रमनगर येथील १७ वर्षे १ महिने असे वय असलेल्या अल्पवयीन बालिकेचा बाल विवाह किरण सावळू बागडी, ( वय २५, मु.पो. दडडी मुदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव ) याच्या सोबत सायंकाळी पाच  वाजता त्र्यंबोली हॉल, विक्रमनगर येथे बाल विवाह होणार असल्याबाबत माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील महेंद्र कांबळे, अभिजित पाटील, अंगणवाडी सेविका गायत्री कुराडे व वैशाली कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. बालिकेच्या जन्म दाखल्याच्या नोंदणीनुसार वयाची शहानिशा करुन बाल विवाह रोखण्यात आला. अल्पवयीन बालिका बाल कल्याण समिती समोर सादर करून बालिकेस बालगृहात दाखल करण्यात आले.या प्रकरणी एस.एस. वाईगडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, श्रीम. अश्विनी खाडे व श्रीम. पद्मजा गारे सदस्या, बाल कल्याण समिती, एस. एन. दाते, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. (Child marriage prevented in Kolhapur)

Related posts

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

लॉजमध्ये गर्भलिंग चाचणी; दोन एजंट महिलांना अटक