Chief secretary: नवे मुख्य सचिव राजेश कुमार रुजू

Chief secretary

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : राज्याचे मुख्य सचिव म्हणून महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार सोमवारी (३०जून) रुजू झाले. मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी ४९ वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला. (Chief secretary)

राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांना अधिक गती देऊन सर्वसामान्यांना आपल्या कामांसाठी मंत्रालयापर्यंत येण्याची आवश्यकता भासू नये यासाठी काम करणार असल्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी यावेळी सांगितले. ते दोन महिन्यांनी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्यांना मुदतवाढ न मिळाल्यास अवघ्या दोन महिन्याचा कार्यकाळ त्यांना मिळणार आहे.

राजेश कुमार यांचा अल्प परिचय

राजेश कुमार हे  भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८८ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. ते मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील आहेत. २५ ऑगस्ट १९८८ रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळविलेली आहे. (Chief secretary) सोलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदापासून २४ जुलै १९८९ रोजी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. त्यानंतर सातारा येथे सहायक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त, धाराशीव जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव, नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त, नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त, मंत्रालयात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे.

हेही वाचा :
बहुमताचा माज मराठी भाषिकांनी उतरवला
अहवाल काहीही येवो, हिंदी लादू देणार नाही : राज

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर