Car accident  : नदीत कार कोसळून पाच ठार

Car accident

रत्नागिरी : प्रतिनिधी : अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या दोन कुटुंबातील सदस्यांवर काळाचा घाला घातल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे जगबुडी पुलावरुन कार नदीत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. (Car accident)

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील मीरा रोड येथील मिताली मोरे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबियांसह माहेरी जात होत्या. मोरे यांचे माहेर देवरुख येथे आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास खेडजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट जगबुडी नदीत कोसळली. कारमध्ये प्रवास करणाऱ्या पाच जणांचा म़त्यू झला आहे. (Car accident)

अपघाताची माहिती कळपाच घटनास्थळी पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. परंतु पाण्याखाली बुडालेल्या कारमधील पाचही प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले नाही. बचावपथकाने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेने परिसरात हळवळ व्यक्त केली जात आहे. (Car accident)

मृतामध्ये मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर, मिताली विवेक मोरे, निहार मोरे, श्रेयश राजेंद्र समावेश यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. परमेश पराडकर, विवेक मोरे गंभीर जखमी झाले आहेत. पराडकर कुटुंबिय नालासोपारा परिसरात तर मोरे कुटुंबिय मिरा भाईंदर येथील रहिवाशी आहेत. (Car accident)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर