BZ Zameer Ahmed Khan: कर्नाटकचा मंत्री म्हणाला, मी युद्धावर जातो…

BZ Zameer Ahmed Khan

बेंगळुरू : पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलायलया सुरूवात केली आहे. देशभर पाकिस्तानविरोधात संतापाची लाट अद्यापही कायम आहे. अशातच कर्नाटकच्या विद्यमान मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे. (BZ Zameer Ahmed Khan)

बीझेड जमीर अहमद खान हे सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात गृहनिर्माण आणि अल्पसंख्याक मंत्री आहेत. त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले. त्यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.

मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान यांनी शुक्रवारी (३ एप्रिल) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, ‘‘पाकिस्तान हा भारताचा कायमच शत्रू राहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला परवानगी दिली तर मी स्वत: पाकिस्तानमध्ये युद्धाला जायला तयार आहोत. (BZ Zameer Ahmed Khan) पाकिस्तानचे आपल्याबरोबर (भारताबरोबर) कसलेही संबंध राहिलेले नाहीत. हा देश कायमच आपला शत्रू राहिला आहे. मोदी, अमित शहा आणि केंद्र सरकारने मला परवानगी दिली तर मी पाकिस्तानमध्ये जाऊन युद्ध करण्यास तयार आहे, असे जमीर अहमद खान म्हटले आहे.

हेही वाचा :
पाकिस्तानवर आयात बंदी
गोगोईंची मुले भारतीय नागरिक नाहीत

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर