Sarma attack on Gogoi : गोगोईंची मुले भारतीय नागरिक नाहीत

Sarma attack on Gogoi

नवी दिल्ली : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी (२ मे) काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर हल्लाबोल केला आहे. गौरव गोगोईंची मुले भारतीय नागरिक नाहीत, असे वक्तव्य सरमा यांनी केले आहे. तसेच त्यांनी गोगोई यांच्या कथित पाकिस्तान भेटीबद्दलही प्रश्न उपस्थित केले. (Sarma attack on Gogoi)

‘‘माझ्याकडे पुरावे आहेत की गौरव गोगोई यांचा मुलगा आणि मुलगी भारतीय नागरिक नाहीत. ते (गोगोई) १५ दिवस तेथे (पाकिस्तान) काय करत होते, याची आम्ही तपासणी करत आहोत. पाकिस्तानमध्ये कोणतेही पर्यटन स्थळ नाही; ते फक्त दहशतवादी अड्डे आहेत,’’ असे सरमा यांनी ‘एएनआय’ला सांगितले.

सरमा यांनी आरोप केला की, ‘‘ते तिथे गेले हे १०० टक्के निश्चित झाले आहे, पण १५ दिवसांत त्यांनी तिथे काय केले? रॉबर्ट वाड्रा आणि गौरव गोगोई यांना भारतापेक्षा पाकिस्तानची जास्त काळजी आहे.’’(Sarma attack on Gogoi)

‘‘मी हे पूर्ण जबाबदारीने सांगतो – आसाममधील एका खासदाराची अल्पवयीन मुले आता भारताचे नागरिक नाहीत. ही फक्त सुरुवात आहे. अजून बरेच काही उघड करायचे आहे.’’ अशी गूढ पोस्ट सरमा यांनी ‘एक्स’वर केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सरमा यांनी उघड भाष्य केले आहे.

सरमा यांनी केलेल्या आरोपांना गोगोई यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही.(Sarma attack on Gogoi)

पाच दिवसांपूर्वी, सरमा यांनी गोगोई यांच्या पाकिस्तान भेटीबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाचे पाकिस्तानस्थित स्वयंसेवी संस्थेशी असलेल्या संबंधांबद्दल ‘एक्स’ वर अनेक मुद्देसूद प्रश्न पोस्ट केले होते.

गोगोई यांचे थेट नाव न घेता, सरमा यांनी विचारले होते की, काँग्रेस नेते सलग १५ दिवस पाकिस्तानला गेले होते. ते का असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी या दौऱ्याच्या उद्देशाबद्दल स्पष्टीकरण मागितले होते.(Sarma attack on Gogoi)

काँग्रेस पक्षाच्या माननीय खासदारांसाठी प्रश्न : १. तुम्ही सलग १५ दिवस पाकिस्तानला भेट दिली का? जर असेल तर कृपया तुमच्या भेटीचा उद्देश स्पष्ट कराल का? असे सरमा यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते. जर तसे असेल तर, पाकिस्तानस्थित संघटना भारतात चालवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी पगार का देत आहे?, असा सवाल सरमा यांनी केला होता.

हेही वाचा :
शेतकरी कर्जमाफीवर अजित पवारांनी हात झटकले
सातबाऱ्यावरील कालबाह्य नोंदी हटवा

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर