Book on Balasaheb Desai: बाळासाहेब देसाई यांच्या भाषणांच्या `विचारधना`चे २६ सप्टेंबरला प्रकाशन

Book on Balasaheb Desai

कोल्हापूर : प्रतिनिधी : लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणांचे `विचारधन` हे पुस्तक प्रसिद्ध झाले असून त्याचे प्रकाशन शुक्रवारी (२६ सप्टेंबर) शिवाजी विद्यापीठात होणार आहे. लोकनेत्यांचे नातू राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सभागृहात दुपारी दोन वाजता कार्यक्रम होणार आहे. (Book on Balasaheb Desai)

लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधिमंडळातील कारकीर्द दीर्घ आणि संस्मरणीय आहे. त्यांनी विधिमंडळात अनेक अभ्यासपूर्ण भाषणे केली आहेत. ही भाषणे अद्याप अप्रकाशित होती. लोकनेत्यांच्या राजकीय कारकीर्दीवर भरपूर लेखन झाले असले तरी त्यांच्या विधिमंडळातील कारकीर्दीबाबत फारसे कुणी लिहिले नव्हते. शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र दिनमानचे संपादक चोरमारे यांनी ही कमतरता दूर केली आहे. लोकनेत्यांच्या विधिमंडळातील निवडक भाषणांचे `विचारधन` हे पुस्तक सिद्ध झाले आहे. (Book on Balasaheb Desai)

त्याचा प्रकाशन समारंभ शुक्रवारी २६ सप्टेंबरला होत आहे. अध्यासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के असतील. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील हेही उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा :
राष्ट्रवादी, पडळकर आणि भाजपचा गेम
उद्धव ठाकरेंचा अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा; शेतकऱ्यांशी संवाद

Related posts

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा प्रफुल्ल पटेल, तटकरेचा पत्ता कट!

‘नीट’ पेपर लिक प्रकरणी महासंचालक अभिषेक सिंह यांना अटक करा  – हर्षवर्धन सपकाळ