Blast in Company: औषध कंपनीत स्फोट; १२ कामगारांचा मृत्यू

Blast in Company

हैदराबाद : येथील एका औषध कंपनीतील रिॲक्टर युनिटमध्ये झालेल्या स्फोटात १२ कामगारांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून १३ कामगारांना वाचवण्यात यश आले. ही दुर्घटना सोमवारी (३० जून) घडली. (Blast in Company)

हैदराबादजवळील पशामिलाराम औद्योगिक क्षेत्रातील सिगाची इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड येथील रिअॅक्टर युनिटमध्ये ही दुर्घटना घडली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व जखमी कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. स्फोटाच्या प्रचंड आवाजापाठोपाठ इमारतीचा मोठा भागही कोसळला. या ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकले असण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. (Blast in Company)

स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली. अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

आग लागल्याची माहिती सकाळी पावणे दहाच्या सुमारास अग्निशमन नियंत्रण कक्षाला मिळाली. तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने प्रयत्नांची शिकस्त केली. प्राथमिक चौकशीनुसार, रिअॅक्टरमध्ये दाब वाढल्याने स्फोट झाला असावा.

नेमके कारण शोधण्याचे तसेच या ठिकाणी सुरक्षाविषयक सर्व नियमांचे पालन केले जात होते की नाही हे तपासण्यासाठी सविस्तर चौकशी सुरू आहे. (Blast in Company) सिगाची कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, ही कंपनी फार्मा एक्सिपियंट्स, न्यूट्रा आणि फूड इन्ग्रिडिअंट्सच्या क्षेत्रात उद्योगातील आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. या घटनेनंतर सूचीबद्ध कंपनी असलेल्या सिगाची इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये घसरण झाली. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, मागील दिवसाच्या बंद किमतीच्या तुलनेत शेअर्स १३.६१% कमी झाले. बीएसईवर प्रति शेअर त्यांची किंमत ४७.६७ रुपये होती.

हेही वाचा :
बहुमताचा माज मराठी भाषिकांनी उतरवला
जगाला संपूर्ण नाशापासून कसे वाचवणार ?

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर