ST discount : एसटीच्या आगाऊ आरक्षणावर १५ टक्के सूट

ST discount

मुंबई : विशेष प्रतिनिधी : एसटी बसच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या किमान १५० कि.मी.पेक्षा जास्त प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीटदरात १५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. अर्थात हा निर्णय सवलतधारक प्रवासी वगळून अन्य प्रवाशांसाठी आहे. (ST discount)

ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी (३० जून) केले. (ST discount)

१ जुलैला एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनी कमी गर्दीच्या हंगामात लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिट दरात १५ टक्के सूट देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बसेससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे.

आषाढी एकादशी, गणेशोत्सवात लाभ

येत्या आषाढी एकादशी आणि गणेशोत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत १ जुलैपासून लागू होत आहे. तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. (ST discount)

इ-शिवनेरीच्या प्रवाशांना लाभ

मुंबई- पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर वा public. msrtcors. com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल ॲपद्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना १५% सवलत मिळविता येणार आहे.

हेही वाचा :
बहुमताचा माज मराठी भाषिकांनी उतरवला
अहवाल काहीही येवो, हिंदी लादू देणार नाही : राज

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर