BJP’s buses for Konkan: कोकणवासीयांसाठी भाजपतर्फे ३५० एसटी बसेस

BJP’s buses for Konkan

मुंबई : विशेष प्रतिनिधी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मुंबई भाजपतर्फे ३५० एसटी बस आणि ट्रेनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवारी (२३ ऑगस्ट)  मुंबई भाजप अध्यक्ष व राज्याचे सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी एसटीला भगवा झेंडा दाखवून या सेवेचा प्रारंभ केला. (BJP’s buses for Konkan)

मुंबईच्या विविध भागातून या गाड्या कोकणाकडे रवाना होणार आहेत. बीकेसीमध्ये या गाड्यांचा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला. शनिवारी या ठिकाणी नारळ वाढवून या सेवेची सुरवात करण्यात आला. यावेळी आमदार संजय उपाध्याय, सुहास आडिवरेकर, कमलाकर दळवी, जितेंद्र राऊत आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

२५ तारखेला एक स्वतंत्र ट्रेन कोकणात रवाना होणार आहे. (BJP’s buses for Konkan)

एसटी बसेस फुल्ल!

दरम्यान, बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या कोकणवासीयांची पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या ४४७९ बसेस गट आरक्षणासह एकूण ५१०३ जादा बसेस फुल्ल झाल्या आहेत.

कोकणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान ५२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २३ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.
-प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार