Bjp criticizes on Congress’s Video: काँग्रेसच्या ‘त्या’ व्हिडीओने भाजपचा संताप अनावर

Bjp criticizes on Congress’s Video

नवी दिल्ली :  बिहार विधानसभा निवडणुकीचा माहोल चांगलाच गरम होऊ लागला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राज्यात रॅली काढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचा दौरा केला. बिहारसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. तेथील काही प्रकल्पांचे उदघाटनही मोदी यांनी केले. यावेळी मोदी यांनी काँग्रेसचे लोक मला आईवरून शिव्या देत असल्याचा आरोप केला. तसेच हा केवळ माझ्या आईचाच अपमान नसून बिहारमधील प्रत्येक आईचा अपमान असल्याची भावनिक साद घातली. (Bjp criticizes on Congress’s Video)

या पार्श्वभूमीवर काँग्रेसने त्यांच्या ‘एक्स’ हॅण्डलवर ‘वोट चोर, गद्दी छोड’सह अनेक व्हिडीओ अपलोड केले आहेत. ते मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत. तथापि, एका व्हिडीओने मात्र भाजप नेत्यांसह त्यांच्या पदाधिकाऱ्यांचीही झोप उडवली आहे.

बिहार काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून मोदी आणि त्यांच्या मातोश्रींचा एआयवर तयार केलेला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वप्नात त्यांची आई त्यांच्यावर ओरडताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. अशा व्हिडीओमुळे काँग्रेसने खालचा स्तर गाठल्याचे म्हटले. काँग्रेसने हा व्हिडीओ कुणाचाही अनादर करण्यासाठी केलेला नसल्याचे  स्पष्ट केले आहे. (Bjp criticizes on Congress’s Video)
दरम्यान, काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना म्हटले, “आपल्या मुलांना चांगली शिकवणूक देणे हे पालकांचे कर्तव्य असते. त्या (पंतप्रधान मोदींच्या दिवंगत मातोश्री हीराबेन मोदी) फक्त आपल्या मुलाला शिक्षण देत आहेत. पण जर मुलाला (पंतप्रधान मोदी) असे वाटत असेल की, हे त्यांचा अनादर करणारे आहे. तर तो त्यांचा प्रश्न आहे.”
काँग्रेसने भाजप आणि मोदी सरकारवर टीका करणारे अनेक व्हिडीओही त्यांच्या ‘एक्स’ हॅण्डलवर पोस्ट केले आहेत.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर