Bomb threat to Delhi HC: दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी

Bomb threat to Delhi HC

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाला शुक्रवारी (१२ सप्टेंबर) बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. त्यामुळे तातडीने कामकाज तहकूब करून सर्व न्यायालये रिकामी करण्यात आली. (Bomb threat to Delhi HC)

सर्व वकील आणि पक्षकार कोर्टाबाहेरच्या हिरवळीवर बसल्याचे एरवी कधी न दिसणारे दृश्य दिसत आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर सकाळी ८.३८ वाजताच्या सुमारास एक मेल आला. यामध्ये न्यायालयाच्या आवारात स्फोट होणार असल्याचा दावा करण्यात आला होता, असे सूत्रांनी सांगितले.

खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाच्या आवारात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या, दोन रुग्णवाहिका आणि बॉम्ब निकामी पथकाचे एक वाहन तैनात करण्यात आले आहे. (Bomb threat to Delhi HC)

न्यायाधीशांच्या चेंबर्स आणि कोर्टरूमची तपासणी केली जात आहे. सुरक्षा कर्मचारी कडक पहारा देत आहेत.

न्यायालयाच्या इमारतीतून वकील, पक्षकार आणि कोर्ट कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर हे सर्वजण आवारातील लॉनमध्ये बसून राहिले. यादरम्यान अनेकांनी जेवण उरकून घेतले.

पोलिसांनी सांगितले की, सकाळी न्यायालयाच्या आवारात बॉम्ब असल्याचा दावा करणाऱ्या ई-मेलवरून पीसीआर कॉल आला. (Bomb threat to Delhi HC)

‘‘आम्ही शोध मोहीम राबवत आहोत. अग्निशमन दलाचे अधिकारी, बॉम्ब निकामी करणारे पथक आणि श्वान पथक घटनास्थळी उपस्थित आहेत,’’ असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी