खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पुणे : शिरूर शहरातील सतरा कमानी पुलाजवळ पुणे-नगर महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस भरधाव वेगात आलेल्या बसची जोरदार धडक बसली. या अपघातात मोटरसायकलवरील तरुण जागीच ठार झाला. दत्तात्रय शिवराम शिंदे (वय ३६ वर्षे, रा शिंदेवाडी मलठण ता शिरूर जि. पुणे) असे मृत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी विकास शिवराम शिंदे यांनी शिरूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत लक्झरी बस क्रमांक  एम. पी. १३. झेड. इ.९७४८  वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Accident)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक