Bhiwandi Murder : भाजप युवा मोर्चाच्या नेत्यासह सहकाऱ्याची निर्घृण हत्या

Praful Tangadi

भिवंडी :  भिवंडीतील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावात भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्याचा सहकारी तेजस तांगडी यांची धारदार शस्त्रांनी निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तीन ते चार हल्लेखोरांनी हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. (Bhiwandi Murder)

प्रफुल्ल तांगडी आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत ‘जे डी टी इंटरप्रायसेस’ या त्याच्या कार्यालयात बसले होते. रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास, चार ते पाच हल्लेखोर अचानक तिथे आले. त्यांनी धारदार शस्त्रांनी प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. (Bhiwandi Murder)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चार ते पाच संशयित असल्याची अंदाज व्यक्त केला आहे.  या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील एक धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे एक वर्षापूर्वीही प्रफुल्ल तांगडी यांच्यावर असाच जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते बचावले होते. मात्र, आजच्या हल्ल्यात हल्लेखोरांनी त्यांचा जीव घेतला.

प्रफुल्ल तांगडी भाजप युवा मोर्चाचे एक सक्रिय कार्यकर्ता आणि जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने या हत्येमागे नेमके कोणते कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. ही हत्या वैयक्तिक वादातून झाली आहे की राजकीय वैमनस्यातून, याचा शोध पोलीस घेत आहेत. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर