Bawankule statement : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र  लढणार

Bawankule statement

मुंबई : प्रतिनिधी :  आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एखादा अपवाद वगळता महायुती एकत्रितपणे लढणार आहे, त्याबाबत आम्ही जिल्हास्तरावरील नेत्यांना सूचना दिल्या आहेत,अशी माहिती  राज्याचे महसूलमंत्री व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली. (Bawankule statement)

बावनकुळे यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची मुंबई सेंट्रल येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला मोठया मताधिक्याने निवडून दिले आहे, त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही आम्ही महायुती म्हणूनच जनतेसमोर जाणार आहोत. अगदीच ज्या ठिकाणी उमेदवारीवरून संघर्ष उदभवेल, अशा एखाद्या मैत्रीपूर्ण लढत होईल, अशा जागा अपवादात्मकच असतील, असे सांगून ते म्हणाले की, निवडणुकींना एकत्रितपणे सामोरे जाण्याबाबतची सूचना आम्ही नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे.त्यांच्याकडून स्थानिकस्तरावर  कार्यकर्त्यांना त्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. निवडणुकाबाबत संभ्रम असण्याचे कारण राहणार नाही. (Bawankule statement)

आगामी निवडणुका युतीत लढणार – प्रफुल्ल पटेल

आगामी निवडणुकांमधील युतीबाबत बोलताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार आहोत, शक्य असेल तिथे युती केली जाईल. मात्र शक्य नसेल तिथे आपण आपल्या ताकदीवर लढू, यासाठी कार्यकर्त्यांना आतापासूनच तयारीला लागलं पाहिजे.’

युतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

भाजप महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार असल्याच्या बावनकुळेच्या विधानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. फडणवीस म्हणाले की, ‘आमची भूमिका पक्की आहे, महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत, मात्र एखाद्या ठिकाणी जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत होईल.’ (Bawankule statement)

निवडणुकीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. ऑक्टोंबर- नोव्हेंबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. अलीकडेच राज्य सरकारने महापालिकांना प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाकडूनही या निवडणुकांची तयारी केली जात आहे.

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या