Bajirao Peshwe Statue: आमच्या नायकांवर अन्याय झाला : मुख्यमंत्री

Bajirao Peshwe Statue

पुणे : मराठा साम्राज्यातील आमच्या काही नायकांवर ब्रिटिश आणि काही स्वदेशी इतिहासकारांनीही अन्याय केल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (४ जुलै) व्यक्त केले. (Bajirao Peshwe Statue)

“आपल्याला वाटले की मुघलानंतर थेट इंग्रजांनीच आमच्यावर राज्य केले. त्यामुळे आपल्या अनेक महानायकांचा विसर आपल्याला पडला. आपल्या हिंदवी स्वराज्याचा व मराठी साम्राज्याचा इतिहासच आपल्या इतिहासातून ‘डिलीट’ करून टाकला,’’ असे फडणवीस म्हणाले.

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. (Bajirao Peshwe Statue)

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. डॉ. मेधा कुलकर्णी, आ. रविंद्र चव्हाण, माजी खा. विनय सहस्त्रबुद्धे आदी यावेळी उपस्थित होते.

“छत्रपती शिवरायांचे सेनानी म्हणून त्याच साम्राज्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे थोरले बाजीराव पेशवे यांचा सुंदर पुतळा एनडीएमध्ये उभारला गेला. आमचे युद्धकौशल्य जिथे शिकवले जाते, अशा ठिकाणी हा पुतळा उभारणे अत्यंत महत्त्वाचे आहे,’’ असेही फडणवीस म्हणाले.

पालखेडची लढाई सर्वोत्तम युद्ध

जनरल मोंटॅगोमेरी दुसऱ्या महायुद्धाच्या निर्णायक युद्धाचे नायक ठरले होते. त्यांनी जगातल्या योद्ध्यांसंदर्भात लिहिलेल्या पुस्तकात पालखेडच्या लढाई ही धोरणात्मकदृष्ट्या हे एक सर्वोत्तम युद्ध होते, असा उल्लेख केल्याचे फडणवीस यांनी लक्षात आणून दिले. यात थोरल्या बाजीराव पेशव्यांचा उल्लेख केल्याचे ते म्हणाले. (Bajirao Peshwe Statue)

थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या लढाईत वेग ही सर्वांत मोठी रणनीती असायची. जेव्हा मुघल साम्राज्याची सेना एका दिवसात आठ ते दहा किलोमीटर प्रवास करायची, तेव्हा थोरल्या बाजीरावांची सेना एका दिवसात ६० ते ८० किलोमीटर अंतर पार करत असे. त्यांचे हे युद्ध कौशल्य होते. छत्रपती शाहू महाराजांनी टाकलेला विश्वास पेशव्यांनी सार्थ ठरवल्याचेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा :
राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागावी : संजय राऊत
‘सारथी’, ‘बार्टी’साठी समान धोरण : अजित पवार

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या