Bachchu Kadu refuses request: मंत्र्यांची विनंती बच्चू कडूंनी फेटाळली

Bachchu Kadu refuses request

अमरावती/मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांची राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी (१३ जून) भेट घेतली. त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र ती कडू यांनी फेटाळून लावली. (Bachchu Kadu refuses request)

जोपर्यंत मागण्या मान्य केल्याची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गेल्या ८ जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कडू यांची उपोषणस्थळी भेट देत कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. (Bachchu Kadu refuses request)

त्यावर रोज १५ ते २० शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकार या प्रश्नात लक्ष घालायला तयार नाही. आम्ही कधीही शेतकरी, शेतमजुरांसोबत विश्वासघात करू शकत नाही. मागण्यांवर एकत्र निर्णय घ्या नाही तर आमची अंत्ययात्रा काढा. या दोन्ही पैकी काही केले तरी ते मान्य आहे, अशी संतप्त भूमिका कडू यांनी यावेळी मंत्री राठोड यांच्यासमोर मांडली.

उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर मंत्री संजय राठोड यांनी सरकारची भूमिका मांडली. बच्चू कडू यांच्या तब्बेतीची आम्हा सर्वांना चिंता आहे. दर मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक होते. त्यामध्ये त्यांच्या मागण्यांचा विषय मी मांडणार आहे. (Bachchu Kadu refuses request)

१४ ऐवजी १५ जूनला चक्काजाम आंदोलन

दरम्यान, विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्यावतीने १४ जूनला होणारे आंदोलन एक दिवस लांबणीवर टाकण्यात आले आहे. बच्चू भाऊ कडू व पाठिंबा देणाऱ्या सर्व नेते, सामाजिक संघटना आणि आंदोलकांच्या निर्देशानुसार हे राज्यव्यापी चक्का जाम  आंदोलन १५ जून रोजी करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे.

आ. संजय खोडके, यशोमती ठाकूर यांचा पाठींबा

कडू यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य संजय खोडके व अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांच्यासह काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी पाठींबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी सुरु लढ्यात आपण सहभागी असल्याचे सुलभा खोडके यांनी सांगितले. मात्र उपोषणाचा मार्ग न अवलंबता शासन दरबारी व मंत्रालय स्तरावर आंदोलन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ. आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन सुलभा खोडके यांनी केले.

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे मोझरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करत आहेत. बच्चू भाऊ सोबत राजकीय मतभेद असले तरी शेतकऱ्याच कल्याण हाच आमच्यासाठी धर्म आहे अस मी मानत आले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

त्यांच्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात २०२४ मध्ये २,६३५ तर मागच्या ६ महिन्यांत ८६९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्ज, नापीकी, अवकाळी पाऊस तसेच सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांना कंटाळून शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. यात विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा अधिक आहे. राज्यातल्या महायुती सरकारने सत्तेत यायच्या आधी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले, पण सत्तेत येताच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. भाजप आणि महायुती सरकारचे घटक राहिलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला सहा  दिवस झाले आहेत. त्यांची साधी दखलही या निगरगट्ट सरकारने घेऊ नये? आज या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी बच्चू कडू यांनी मांडलेल्या मुद्यांना गांभीर्याने घ्यावे. तसेच त्वरित शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. (Bachchu Kadu refuses request)

हेही वाचा :
मी जिवंत कसा बाहेर पडलो ?

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर