नवी दिल्ली : सुप्रिम कोर्टात सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न एका वकिलांने केला. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखत वकिलांना अडवून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाने ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा दिल्या. कोर्टात गोंधळ झाला असतानाही सरन्यायाधीश गवई यांनी विचलित न होता कामकाज थांबू न देता सुनावणी सुरू ठेवली. या घटनेने खळबळ उडाली आहे. (Attempted attack on Gavai)
सनातन का अपमान..नही सहेंगा हिंदूस्थान
आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एक वकील सरन्यायाधीशांच्या दिशेने धावला. वकिल बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावत असताना सुरक्षारक्षकांनी त्यांच्यावर झडप टाकून त्याला पकडले आणि न्यायालयातून बाहेर नेले. बाहेर नेताना या वकिलाने ‘सनातन का अपमान..नही सहेंगा हिंदूस्थान’ अशा घोषणा दिल्या. न्यायालयाबाहेर जात असतानाही त्याची घोषणाबाजी सुरू होती. या वकिलाचे नाव राकेश किशोर असे आहे.
या घटनेने न्यायालयात गोंधळ उडाला. पण सरन्यायाधीश गवई यांनी न्यायालयाचे कामकाज थांबवू दिले नाही. त्यांनी कोर्टाचे कामकाज सुरू ठेवण्यास सांगितले. ते म्हणाले, हे सगळं पाहून कोणीही विचलित होऊ नका. मी देखील विचलित झालो नाही. अशा घटनांनी मला फरक पडत नाही” (Attempted attack on Gavai)
खजुराहो मंदिरात नवीन विष्णू देवतेची मूर्ती बसवण्याची मागणी
मध्य प्रदेशातल प्रसिद्ध खजुराहो मंदिर परिसरातील जावरी मंदिरातील सात फूट उंचीच्या भगवान विष्णूंची शीर नसलेली मूर्ती हटवून त्या ठिकाणी नवीन मूर्ती बसवावी अशी मागणी करणारी याचिका करण्यात आली आहे. १७ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. ही बाब पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारित येते असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यावेळी सरन्यायाधीश गवई म्हणाले होती. तुम्ही इथून जात आणि भगवान विष्णूकडे प्रार्थना करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा, तुम्ही असे म्हणत आहात की तुम्ही भगवान विष्णूचे भक्त आहात. मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा. कारण खजुराहो मंदिर पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारे स्थळ आहे. पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय तिथे काही करता येत नाही. तिथे काही करायचे असेल तर पुरातत्व विभागाच् परवानी घ्यावी लागते. त्यामुळे आम्ही या प्रकरणात दखल देऊ शकत नाही. याबाबत आम्हाला खेद वाटतो. (Attempted attack on Gavai)