अश्विनी भिडे मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त; कोल्हापुरातून प्रशासकीय कामकाजास सुरुवात

Ashwini Bhide is the first female Commissioner of the BMC

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली. त्या मुंबई महानगरपालिकेत पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून भिडे यांची कारकीर्द सुरू झाली होती. २७ वर्षाच्या कारकीर्दीत विविध पदावर काम करत त्यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी झाली आहे. (Ashwini Bhide is the first female Commissioner of the BMC)

महानगरपालिका आयुक्त भूषण गुगराणी आज ३१ मार्च रोजी निवृत्त होत आहेत. या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागले होते. आयुक्तपदाच्या शर्यतील मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. मिलिंद म्हैसकर यांची नावे चर्चेत होती. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यात चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Ashwini Bhide is the first female Commissioner of the BMC)

अश्विनी भिडेंची कारकीर्द

अश्विनी भिडे या १९९५ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून त्यांची प्रशासकीय कारकीर्द कोल्हापुरातून सुरू झाली. १९९७ ते १९९९ या काळात त्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली करण्यात आली. नागपूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या संयुक्त सचिव, मुंबई महानगर विकास प्राधिकरण अतिरिक्त आयुक्त, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१५ मध्ये मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली. मेट्रो वुमन म्हणून त्यांना नवी ओळख मिळाली. २०२४ पासून भिडे या मुख्यमंत्री कार्यालय प्रधान सचिव म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. (Ashwini Bhide is the first female Commissioner of the BMC)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर